"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2024 22:12 IST2024-11-24T22:11:47+5:302024-11-24T22:12:30+5:30
"महाराष्ट्र विधानसभा 2024 च्या निवडणुकीत महायुतीला मिळालेला महाविजय फक्त भाजपा-महायुतीचा नाही, तर महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाच्या विश्वासाचा आहे. तुम्ही दाखवलेल्या या विश्वासासाठी आणि दिलेल्या प्रेमाबद्दल महाराष्ट्राच्या जनतेपुढे मी नतमस्तक होतो."

"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
महाराष्ट्र विधानसभा निडवणुकीत भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीला अतिप्रचंड बहुमत मिळाले आहे. राज्यातील जनतेने महायुतीला स्पष्ट कौल दिला आहे. भरभरून मतदान केले आहे. महत्वाचे म्हणजे, या निवडणुकीत भाजपलाही नभूतो, असे यश मिळाले. भाजपने महाराष्ट्रात सलग तिसऱ्यांदा 100 हून अधिक जागा जिंकल्या आहेत. यानंतर आता, भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आभार मानण्यासाठी राज्यातील जनतेला पत्र लिहिले आहे. यात, "मेहनत, एकजूटता, लाडक्या बहिणींचे आशीर्वाद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वावर महाराष्ट्राच्या तमाम जनतेने दाखविलेला विश्वास, या विजयाचे खरे शिल्पकार असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.
वाचा देवेंद्र फडणवीस यांचं पत्र..., जसं आहे तसं... -
प्रिय बंधु-भगिनींनो,
सप्रेम नमस्कार,
महाराष्ट्र विधानसभा 2024 च्या निवडणुकीत महायुतीला मिळालेला महाविजय फक्त भाजपा-महायुतीचा नाही, तर महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाच्या विश्वासाचा आहे. तुम्ही दाखवलेल्या या विश्वासासाठी आणि दिलेल्या प्रेमाबद्दल महाराष्ट्राच्या जनतेपुढे मी नतमस्तक होतो.
मेहनत, एकजूटता, लाडक्या बहिणींचे आशीर्वाद आणि मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्त्वावर महाराष्ट्राच्या तमाम जनतेने दाखविलेला विश्वास या विजयाचे खरे शिल्पकार आहेत. महायुतीतील सर्व घटक पक्षांचे नेते, पदाधिकारी, मित्रमंडळी आणि माझा प्रत्येक समर्पित कार्यकर्ता ज्यांनी गेले काही दिवस जिवाचे रान करून वेळ-काळ न पाहता मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, अशा सर्वांचा मी कायम ऋणी राहीन!
आपणा सर्वांच्या पाठिंब्यामुळेच महायुतीला मिळालेल्या या विजयाने एक नवीन दिशा दिली आहे. हे यश आपल्या महाराष्ट्राला एक प्रगतीशील आणि सर्वसमावेशक भवितव्यासोबत मा. मोदीजींच्या नेतृत्वात विकसित भारतासह विकसित महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रेरणा देत राहील.
पुन्हा एकदा आपले मनःपूर्वक आभार. आपला विश्वास आणि प्रेम सदैव राहो. हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
आपलाच,
देवेंद्र फडणवीस
प्रिय बंधु-भगिनींनो,
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 24, 2024
सप्रेम नमस्कार,
महाराष्ट्र विधानसभा 2024 च्या निवडणुकीत महायुतीला मिळालेला महाविजय फक्त भाजपा-महायुतीचा नाही, तर महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाच्या विश्वासाचा आहे. तुम्ही दाखवलेल्या या विश्वासासाठी आणि दिलेल्या प्रेमाबद्दल महाराष्ट्राच्या जनतेपुढे मी… pic.twitter.com/Ti6kOBuc59