महाराष्ट्रात सत्ता आणण्यासाठी काँग्रेसने तीन निरीक्षक नेमले; पैकी दोन सत्ता गमावलेले मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2024 19:57 IST2024-11-22T19:57:15+5:302024-11-22T19:57:37+5:30
Maharashtra Assembly Election 2024: काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी महाराष्ट्र आणि झारखंडसाठी निरीक्षकांची नियुक्ती केली आहे.

महाराष्ट्रात सत्ता आणण्यासाठी काँग्रेसने तीन निरीक्षक नेमले; पैकी दोन सत्ता गमावलेले मुख्यमंत्री
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची उद्या मतमोजणी असून एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने आले आहेत. असे असले तरीही मविआ आणि महायुती दोघांनीही बहुमत मिळाले नाही तर जुळवाजुळव करण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. दोन्ही बाजुंकडून अपक्ष, लहान पक्षांच्या आमदारांना आपल्याबाजुने करण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत.
महाराष्ट्रातील व झारखंडमधील राजकीय परिस्थितीवर, काँग्रेसच्या आमदारांवर लक्ष ठेवण्यासाठी काँग्रेसने दोन्ही राज्यांसाठी प्रत्येकी तीन-तीन निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. महाराष्ट्रात नियुक्ती करण्यात आलेल्या तीनपैकी दोन निरीक्षक हे दोन राज्यांचे माजी मुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी त्यांच्या राज्यातील सत्ता गमावलेली आहे.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी महाराष्ट्र आणि झारखंडसाठी निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. खरगे यांनी पक्षाचे नेते राजस्थान माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, छत्तीसगढचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि कर्नाटकचे नेते डॉ. जी. परमेश्वर यांना निरीक्षक बनवण्यात आले आहे. त्याचबरोबर तारिक अन्वर, मल्लू भट्टी विक्रमार्क आणि कृष्णा अल्लावुरु यांना झारखंडसाठी निरीक्षक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.