"लोकांमध्ये आक्रोष, प्रचंड चीड, ही लाट देवेंद्र फडणवीसांचा कार्यक्रमच लावणार’’, जरांगेंचा पुन्हा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2024 17:24 IST2024-10-17T17:24:45+5:302024-10-17T17:24:58+5:30
Maharashtra Assembly Election 2024: इथे सुखी कुणीच नाही. ही आक्रोषाची लाट यांना होरपळवून काढणार आहे. ही लाट देवेंद्र फडणवीसांचा कार्यक्रमच लावणार आहे, असा इशारा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी दिला आहे.

"लोकांमध्ये आक्रोष, प्रचंड चीड, ही लाट देवेंद्र फडणवीसांचा कार्यक्रमच लावणार’’, जरांगेंचा पुन्हा इशारा
मराठा आरक्षणा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी भाजपा आणि भाजपाचे महाराष्ट्रातील नेते देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा इशारा दिला आहे. इथे सुखी कुणीच नाही. ही आक्रोषाची लाट यांना होरपळवून काढणार आहे. ही लाट देवेंद्र फडणवीसांचा कार्यक्रमच लावणार आहे, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा इशारा दिला. ते म्हणाले की, ही लाट आहे. याला गर्दी म्हणून नका. ही आक्रोषाची लाट आहे आणि ती १०० टक्के विजयाकडे जाणार आहे. धोका करणाऱ्याला आता ते सोडणार नाहीत. आक्रोषाची ही गर्दी प्रचंड चिडलेली आहे. इथे ना मराठा सुखात आहे. ना मुस्लिम, ना दलित ना गोरगरीब ओबीसी सुखात आहे, ना गरीब धनगर सुखात आहे. इथे सुखी कुणीच नाही. ही आक्रोषाची लाट यांना होरपळवून काढणार आहे. ही लाट देवेंद्र फडणवीसांचा कार्यक्रमच लावणार आहे.
जरांगे पाटील पुढे म्हणाले की, लोकांना चीड सहन होत नाही आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे समाज वेगळ्या मनस्थितीतून जात आहे. समाज ज्या मनस्थितीत जायला नको होता. त्या मनस्थितीत जाण्यासाठी केवळ देवेंद्र फडणवीस यांनी समाजाला भाग पाडलं आहे. आधी जो शेतकरी आणि समाज देवेंद्र फडणवीस यांना सोडून कुठे बाजूला नव्हता. मात्र याच देवेंद्र फडणवीस यांनी जो समाज त्यांच्या बाजूने होता त्याचा मुडदा पाडण्याचं काम केलं. देवेंद्र फडणवीय यांनी असे वार केले की, त्या वारांनी समाजाचं आयुष्य पूर्ण उद्ध्वस्त झालंय, असा गंभीर आरोप जरांगे पाटील यांनी केला.