‘डेटिंग ॲप’ पार्टनरसोबतच पटवणार मतदानाचे महत्त्व; निवडणूक आयोगाची नवी शक्कल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2024 09:33 IST2024-04-23T09:32:59+5:302024-04-23T09:33:53+5:30
मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी टिंडरच्या वापरकर्त्याच्या प्रोफाइलवर ‘व्होटिंग पार्टनर निडेड’, ‘फर्स्ट-टाइम व्होटर’ व ‘आय व्होट’ असे स्टिकर्स दिसू लागले आहेत.

‘डेटिंग ॲप’ पार्टनरसोबतच पटवणार मतदानाचे महत्त्व; निवडणूक आयोगाची नवी शक्कल
मुंबई - मतदारांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करण्यासाठी निवडणूक आयोगाने आता तरुणांमध्ये प्रिय असलेल्या ‘डेटिंग ॲप’चा आधार घेतला आहे. २ कोटी नवमतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी ही शक्कल लढविण्यात आली असून ‘एव्हरी सिंगल व्होट काऊंटस’ ही मोहीमच आयोगाकडून सुरू करण्यात आली आहे.
तरुण व शहरी मतदारांमध्ये मतदानाविषयी उदासीनता आहे. त्यांना मतदानकेंद्रापर्यंत आणण्यासाठी आता निवडणूक आयोगाने सोशल मीडियाचा वापर सुरू केला आहे. ‘टर्निंग १८’ या मोहिमेच्या माध्यमातून यासाठी प्रयत्न केले जात आहे. सर्व प्रमुख समाजमाध्यमांवर निवडणूक आयोग सक्रिय झाला आहे. मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी टिंडरच्या वापरकर्त्याच्या प्रोफाइलवर ‘व्होटिंग पार्टनर निडेड’, ‘फर्स्ट-टाइम व्होटर’ व ‘आय व्होट’ असे स्टिकर्स दिसू लागले आहेत.
मतदानासाठी सोबत मित्र किंवा मैत्रिणी असल्यास मतदानाची इच्छा प्रबळ होईल म्हणून हा उपक्रम हाती घेण्यात आल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी दिली.