राजकीय स्वार्थासाठी जाती-धर्मांत तेढ निर्माण करणे अयोग्य - अजित पवार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 16:31 IST2026-01-10T16:30:43+5:302026-01-10T16:31:32+5:30

सभेत आझम काजी यांच्या समर्थकांनी त्यांच्याविषयी संवाद साधण्यासाठी आग्रह धरला, पण अजित पवार यांनी यावर भाष्य टाळलं 

It is wrong to create divisions between castes and religions for political gain says Ajit Pawar | राजकीय स्वार्थासाठी जाती-धर्मांत तेढ निर्माण करणे अयोग्य - अजित पवार 

राजकीय स्वार्थासाठी जाती-धर्मांत तेढ निर्माण करणे अयोग्य - अजित पवार 

मिरज : केवळ राजकीय स्वार्थासाठी जाती-धर्मांमध्ये तेढ निर्माण करणे योग्य नाही, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मिरजेत पक्षाच्या प्रचारसभेत स्पष्ट केली.

मिरजेसारख्या आरोग्यपंढरीला आरोग्य सेवेचा मोठा वारसा आहे. त्यामुळे बंद असलेले वॉन्लेस हॉस्पिटल पुन्हा सुरू करणे गरजेचे आहे, असे सांगून त्यांनी सांगलीतील ड्रेनेजच्या प्रश्नावरही भाष्य केले. ते पुढे म्हणाले, आम्ही छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांनी राजकारण करतो. राजकीय स्वार्थासाठी जाती-धर्मांत तेढ निर्माण करणे योग्य नाही. काही पक्ष २४ तास सात दिवस पाणी देण्याचे आश्वासन देतात, पण ते अशक्य आहे.

सभेत आझम काजी यांच्या समर्थकांनी त्यांच्याविषयी संवाद साधण्यासाठी आग्रह धरला, पण अजित पवार यांनी यावर भाष्य टाळलं. प्रभाग ३ मधील शिंदेसेनेचे उमेदवार सागर वनखंडे यांनी येऊन अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी मंत्री मकरंद पाटील, माजी खासदार संजयकाका पाटील, माजी मंत्री अजितराव घोरपडे, शिवाजीराव नाईक, आमदार इद्रिस नायकवडी, शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे आणि अन्य उमेदवार उपस्थित होते.

Web Title : राजनीतिक लाभ के लिए जाति-धर्म में मतभेद पैदा न करें: अजित पवार

Web Summary : अजित पवार ने जोर दिया कि राजनीतिक लाभ के लिए जातियों और धर्मों के बीच मतभेद पैदा करना गलत है। उन्होंने मिरज में वाॅनलेस अस्पताल को फिर से शुरू करने की आवश्यकता पर प्रकाश डाला और सांगली में जल निकासी के मुद्दों को संबोधित किया, शिवाजी महाराज, फुले, शाहू और आंबेडकर के सिद्धांतों पर आधारित राजनीति की वकालत की।

Web Title : Don't create discord in caste-religion for political gain: Ajit Pawar

Web Summary : Ajit Pawar emphasized that creating discord between castes and religions for political gains is wrong. He highlighted the need to restart Wanless Hospital in Miraj and addressed drainage issues in Sangli, advocating for politics based on the principles of Shivaji Maharaj, Phule, Shahu, and Ambedkar.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.