महाराष्ट्र निवडणूक २०१९: वरळीत सकाळपासून पाच ईव्हीएम बदलली; मतदारांनी पाठच फिरवली
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2019 13:37 IST2019-10-21T13:34:39+5:302019-10-21T13:37:26+5:30
वरळी मतदारसंघातील 62 क्रमांकाच्या मतदान केंद्रामध्ये हा प्रकार घडला आहे.

महाराष्ट्र निवडणूक २०१९: वरळीत सकाळपासून पाच ईव्हीएम बदलली; मतदारांनी पाठच फिरवली
मुंबई : शिवसेनेचे उमेदवार आदित्य ठाकरे लढवत असलेल्या वरळी मतदारसंघात तब्बल पाचवेळा ईव्हीएममध्ये बिघाड झाला आहे. हा एक प्रकारच विक्रमच असून ऐन गर्दीच्या वेळी ईव्हीएम बिघडल्याने मतदानावर मोठा परिणाम झाला आहे.
वरळी मतदारसंघातील 62 क्रमांकाच्या मतदान केंद्रामध्ये हा प्रकार घडला आहे. यामुळे निवडणूक अधिकारी आणि पोलिसांची धावपळ उडाली असून मतदाराना मनस्ताप सहन करावा लागत आहे. दोन तासांपासून मतदार मशीन सुरू होण्याची वाट पाहत आहेत. काही मतदारांनी तिथेच थांबून राहण्यापेक्षा घरी जाणेच पसंत केले आहे.
यानंतर आणलेले मशीन पुन्हा बिघडल्याने व जेवणाची वेळ झाल्याने रांगेत खोळंबलेले मतदार निवडणूक अधिकाऱ्यांवर चिडले आहेत. सकाळपासून या केंद्रावर तब्बल पाचवी मशीन बदलण्यात आली आहे. यामुळे मोठ्या संख्येने मतदार माघारी फिरले असून मतदान कधी सुरळीत होईल याची निवडणूक अधिकारी माहितीच देत नाहीत.