चंद्रपूरमध्ये काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष शिगेला, विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर आमनेसामने

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 13:36 IST2026-01-21T13:35:47+5:302026-01-21T13:36:41+5:30

Chandrapur Municipal Corporation Election Result: चंद्रपूर महानरपालिकेमध्ये सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या असतानाच काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर आणि आमदार विजय वडेट्टीवार यांच्यातील अंतर्गत संघर्ष शिगेला पोहोचला आहे. तसेच दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहे. 

Chandrapur Municipal Corporation Election Result: Internal conflict within Congress escalates in Chandrapur, Vijay Vadettiwar and Pratibha Dhanorkar face to face | चंद्रपूरमध्ये काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष शिगेला, विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर आमनेसामने

चंद्रपूरमध्ये काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष शिगेला, विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर आमनेसामने

नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत विदर्भातील चंद्रपूरमध्ये काँग्रेसने दमदार कामगिरी करत राज्यातील सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपाला धोबीपछाड दिला होता. ६६ सदस्यसंख्या असलेल्या चंद्रपूरच्या महानगरपालिकेत २७ नगरसेवकांसह काँग्रेस सर्वात मोोठा पक्ष ठरला होता. तसेच काँग्रेस आणि जनविकास सेना यांच्या आघाडीला मिळून एकूण ३० जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे काँग्रेस पक्ष सत्तास्थापनेच्या जवळ पोहोचला आहे. मात्र काँग्रेसला सत्तास्थापनेसाठी ४ सदस्यांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. पण सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या असतानाच काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर आणि आमदार विजय वडेट्टीवार यांच्यातील अंतर्गत संघर्ष शिगेला पोहोचला आहे. तसेच दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहे. 
एकीकडे भाजपाकडून चंद्रपूरमध्ये सत्ता स्थापनेसाठी चाचपणी करून ऑपरेशन लोटस राबवण्याची तयारी सुरू करण्यात आल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे खासदार प्रतिभा धानोरकर आणि आमदार विजय वडेट्टीवार यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. या दोन्ही नेत्यांमधील वादामुळे काँग्रेसची नागपूर  येथील नियोजित बैठक पुढे ढकलण्यात आली आहे.

विजय वडेट्टीवार यांनी दोन गट करून काँग्रेस पक्षाचं विभाजन केल्याचा आरोप प्रतिभा धानोरकर यांनी केला. त्या म्हणाल्या की, निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी सर्वजण घरी असतानाच आमच्याच पक्षाच्या एका मोठ्या नेत्याने नगरसेवक घरी असताना त्यांना उचलून नेलं. पक्षाचे नगरसेवक असे उचलून नेऊन त्यांचे वेगवेगळे गट करण्याची गरज नव्हती. पण इथे चुकीची पद्धत अवलंबली गेली आणि त्यामधून काँग्रेसचं दोन गटांमध्ये विभाजन झालं, असा आरोप प्रतिभा धानोरकर यांनी केला. तसेच जर सोईसाठी नगरसेवकांना न्यायचं होतं, तर सर्वांनाच एकत्र घेऊन जायला पाहिजे होतं, असेही प्रतिभा धानोरकर म्हणाल्या.

धानोरकर यांच्या या टीकेनंतर विजय वडेट्टीवार यांनीही त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, मी कुठल्याही नगरसेवकाला बोलावलं नाही. मी कुठल्याही नगरसेवकाच्या दरवाजात गेलो नाही. स्वत:हून ते नगरसेवक आले. आता हायकमांड येतील आणि कोण कुणाला घेऊन गेलं, हे त्या नगरसेवकांना प्रत्यक्ष विचारेल. शेवटी खासदार झाले म्हणजे जिल्ह्याचे लोकसभेचे मालक ठरत नाहीत. इथे कार्यकर्त्यांना सांभाळणं हे नेत्यांचही काम आहे, असा टोलाही वडेट्टीवार यांनी लगावला.

दरम्यान,  चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत भाजपाचे २४ नगरसेवक जिंकून आले आहेत. तर काँग्रेसचे २७ नगरसेवक निवडून आले आहेत. तर जनविकास सेनेचे ३ नगसरेवक मिळून काँग्रेस आघाडीच्या नगरसेवकांची संख्या ३० एवढी होत आहे. मात्र महानगरपालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी ३४ नगरसेवकांचे बहुमत आवश्यक आहे. त्यामुळे काँग्रेसला अजूनही चार नगरसेवकांची गरज आहे. तर चंद्रपूरमध्ये उद्धवसेनेचे ६ नगरसेवक जिंकून आले असून, त्यामुळे उद्धवसेना किंगमेकर ठरली आहे. त्यामुळे आता पुढच्या काही दिवसांत येथे काय घडामोडी घडतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

Web Title : चंद्रपुर में कांग्रेस में अंदरूनी कलह बढ़ी, वडेट्टीवार और धानोरकर आमने-सामने।

Web Summary : चंद्रपुर कांग्रेस में अंदरूनी कलह बढ़ गई है क्योंकि धानोरकर ने वडेट्टीवार पर हाल के चुनावों में लाभ के बाद पार्टी को विभाजित करने का आरोप लगाया है। दोनों नेताओं ने आरोप-प्रत्यारोप किए, जिससे गठबंधन प्रयासों पर असर पड़ा और सरकार बनाने के लिए महत्वपूर्ण बैठकें टल गईं। उद्धव सेना किंगमेकर बनकर उभरी।

Web Title : Congress infighting escalates in Chandrapur, Vadettiwar and Dhanorkar clash.

Web Summary : Chandrapur Congress faces internal conflict as Dhanorkar accuses Vadettiwar of dividing the party after recent election gains. Both leaders trade accusations, impacting coalition efforts and delaying crucial meetings for forming government. Uddhav Sena emerges as kingmaker.