‘वाद मिटला, चंद्रपूरमध्ये काँग्रेसचा महापौर होणार, कोण होणार ते…’, विजय वडेट्टीवार यांनी केले स्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 14:29 IST2026-01-22T14:23:30+5:302026-01-22T14:29:10+5:30
Chandrapur Municipal Corporation Election: चंद्रपूर महानगरपालिकेमधील वादावर अखेरीस पडदा पडला असून, तिथे महापौर कोण होणार याबाबतचा निर्णय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ घेणार असल्याचे, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.

‘वाद मिटला, चंद्रपूरमध्ये काँग्रेसचा महापौर होणार, कोण होणार ते…’, विजय वडेट्टीवार यांनी केले स्पष्ट
नागपूर – चंद्रपूर महानगरपालिकेमधील वादावर अखेरीस पडदा पडला असून, तिथे महापौर कोण होणार याबाबतचा निर्णय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ घेणार असल्याचे, काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले आहे. चंद्रपुरात पाच वर्ष काँग्रेसचा महापौर असणार,सगळ्यांचे समाधान होईल असा निर्णय काँग्रेस घेणार असे सांगत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणाला पूर्णविराम दिला आहे.
चंद्रपूर महापालिकेबाबत काँग्रेस पक्षात वाद निर्माण झाल्याने चंद्रपुरात काय होणार याकडे सगळ्यांचे लक्ष होते. भाजपचे कोणतेही नेते कितीही ओरडले तरी चंद्रपुरात काँग्रेसचाच महापौर होणार अस,काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी आज ठासून सांगितले. नेत्यांमध्ये गैरसमज होत असतात पण कार्यकर्ता हा महत्वाचा असल्याने त्यांना समाधान वाटेल असा निर्णय घेण्यात येईल, असं वडेट्टीवार यांनी स्पष्टं केले.
चंद्रपुरात महापौर बसविण्यासाठी आवश्यक असलेले संख्याबळ जमले असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील नेत्यांशी चर्चा झाली आहे. शिवसेना हा पक्ष काँग्रेस बरोबर सत्तेत असेल असा विश्वास विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.