चंद्रपुरातील दारुबंदी उठवण्याची ठाकरे सरकारकडून तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2020 11:51 AM2020-01-15T11:51:18+5:302020-01-15T11:51:24+5:30

पाच वर्षांपूर्वी भाजप सरकारने चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी करण्याचा निर्णय घेतला होता.

chandrapur liquor ban decision may revoke by thackeray govt | चंद्रपुरातील दारुबंदी उठवण्याची ठाकरे सरकारकडून तयारी

चंद्रपुरातील दारुबंदी उठवण्याची ठाकरे सरकारकडून तयारी

googlenewsNext

मुंबई : अवैध दारुविक्री आणि महसूल नुकसानामुळे महाविकास आघाडी सरकार चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदी हटवण्याच्या तयारीत आहे. आतापर्यंत सरकारचे कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाल्याने हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात असून, या विषयी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली असल्याचे वृत्त एबीपी माझाने दिले आहे.

पाच वर्षांपूर्वी भाजप सरकारने चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी करण्याचा निर्णय घेतला होता. तर भाजप सरकार सत्तेमध्ये असेपर्यंत हा निर्णय कायम राहिला असल्याचे पाहायला मिळाले. मात्र ठाकरे सरकार आता चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदी हटवण्याच्या तयारीत आहे.

दारुबंदीमुळे गेल्या पाच वर्षांत चंद्रपूर जिल्ह्यात 200 कोटी रुपयांचा महसूल बुडाला. बेकायदा विक्रीमुळे महसूल बुडत असल्याचं समोर आल्यानंतर महसूलवाढीसाठी ठाकरे सरकार दारुबंदी हटवण्याचा तयारीत असल्याचे बोलले जात आहे.

Web Title: chandrapur liquor ban decision may revoke by thackeray govt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.