Maharashtra Assembly Election 2024 Result : चंद्रकांत पाटलांचं उद्धव ठाकरेंबद्दल मोठं वक्तव्य; म्हणाले, "ते सोबत येणं हा..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 11:34 IST2024-11-23T11:34:47+5:302024-11-23T11:34:47+5:30

Maharashtra Assembly Election Result 2024: आज महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. सुरुवातीच्या कलांमध्ये महायुतीनं जोरदार मुसंडी मारल्याचं दिसत आहे. यानंतर चंद्रकांत पाटलांनी उद्धव ठाकरेंवर मोठं वक्तव्य केलंय.

bjp leader Chandrakant Patal s big statement about Uddhav Thackeray Maharashtra Assembly Election Result 2024 no chances to come together | Maharashtra Assembly Election 2024 Result : चंद्रकांत पाटलांचं उद्धव ठाकरेंबद्दल मोठं वक्तव्य; म्हणाले, "ते सोबत येणं हा..."

Maharashtra Assembly Election 2024 Result : चंद्रकांत पाटलांचं उद्धव ठाकरेंबद्दल मोठं वक्तव्य; म्हणाले, "ते सोबत येणं हा..."

Maharashtra Assembly Election Result 2024: आज महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. सुरुवातीच्या कलांमध्ये महायुतीनं जोरदार मुसंडी मारल्याचं दिसत आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये महायुती २२१ जागांवर तर महाविकास आघाडी ५५जागांवर आघाडीवर असल्याचं दिसून येतंय. यानंतर उद्धव ठाकरेंबाबत भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी वक्तव्य केलं आहे. "समोर महायुती २२२ आणि महाविकास आघाडी ५६ दाखवत आहेत, शिवाय इतर मधले किमान ७ महायुतीसोबत येणारेत म्हणजेच २२९ असताना उद्धवजी सोबत येणं हा महायुतीच्या बाजूने होणाऱ्या प्रयत्नाचा भाग असू शकत नाही," असं चंद्रकांत पाटील म्हणले.

"उद्धव ठाकरेंनी जर पुढाकार घेतला आणि त्यांना जर हे आपलं नैसर्गिक जग नाही हे जाणवलं, तर त्याचा निर्णय आमचं वरिष्ठ नेतृत्व करेल," असं चंद्रकांत पाटील म्हणाले. एबीपी माझाशी साधलेल्या विशेष संवादादरम्यान त्यांनी यावर भाष्य केलं "जर त्यांनी पुढाकार घेतला तर त्याचा निर्णय आमची केंद्रीय संसदीय समिती घेईल. २०१९ मध्ये लोकांनी कौल दिला असतानाही त्यांनी वेगळी वाट धरली. त्याचं अनेकांनाही दु:ख झालं तसं मलाही झालं. महाराष्ट्राचं भलं भाजप आणि शिवसेनेने २०१४ मध्ये जे केलं ते २०१९ लाही झालं असतं. निकालही पाहायची गरज लागली नसती. पण त्यांनी वेगळी वाट धरली. त्यांनी स्वत:चंही नुकसान करून घेतलं, पक्षाचंही नुकसान केलं, राज्याचंही नुकसान केलं. भाजपला काहीच फरक पडत नाही," असंही त्यांनी नमूद केलं.

Maharashtra Election Results 2024

आम्ही समाधानी...

"भाजप हा असा पक्ष जो २ लाही समाधानी आणि ३०३ लाही समाधानी. जर ते याचा पश्चाताप होऊन येणार असले तर महाराष्ट्रातल्या कोणत्याही सामान्य माणसाला आनंदच होईल, कारण ती नैसर्गिक युती आहे. पण पुलाखालून इतकं पाणी  गेलंय, इतके शिव्या शाप, वाटेल ते बोलणं झालंय. राऊत बोलले ते कोणी मनावर घेतलं नाही, त्यांना ते कामच दिल्याचे ते म्हणाले. जेव्हा विनोद तावडेंबद्दल चौकशी करा असं उद्धव ठाकरे बोलले तेव्हा दु:ख झालं. माझ्या आधीपासून तावडे मातोश्रीवर जातात, यांचे मित्र, राजकारणात जाऊन असं वक्तव्य केलं. मला पवारांचं वक्तव्य आवडलं. मी त्यांना ४० वर्षांपासून ओळखतो, मला माहिती घ्यावी लागेल असं ते म्हणाले. तावडेंनीही त्यांचे आभार मानले. आपण वाहत चाललोय हे कोणत्या दिशेनं वाहत चाललोय हे पाहावं," असं पाटील यावेळी म्हणाले.

सुरुवातीच्या कलात सुपडा साफ

राज्यातील विधानसभा निवडणुकीचे सुरुवातीचे कल हाती आले त्यात आतापर्यंत भाजपा सर्वात मोठा पक्ष बनलेला आहे. भाजपाच्या १३२ जागा, शिवसेनेच्या ५४ जागा तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी ३५ जागांवर आघाडी आहे. या निकालात महाविकास आघाडीचा सुपडासाफ झाल्याचं दिसून येत आहे. महाविकास आघाडीतील शरद पवारांच्या राष्ट्रवादीला १८ जागा आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला १९ जागांवर आघाडी आहे. तर काँग्रेस १९ जागांवर आघाडी आहे. 

Web Title: bjp leader Chandrakant Patal s big statement about Uddhav Thackeray Maharashtra Assembly Election Result 2024 no chances to come together

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.