निवडणुकीपूर्वीच राज ठाकरेंना धक्का; मनसे उमेदवाराचा अर्ज छाननीत बाद, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2024 16:45 IST2024-10-30T16:44:40+5:302024-10-30T16:45:14+5:30

Maharashtra Assembly Election 2024 : उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यामुळे मनसेला मोठा धक्का बसला आहे.

Big shock to Raj Thackeray, MNS candidate's application rejected from Akola | निवडणुकीपूर्वीच राज ठाकरेंना धक्का; मनसे उमेदवाराचा अर्ज छाननीत बाद, कारण...

निवडणुकीपूर्वीच राज ठाकरेंना धक्का; मनसे उमेदवाराचा अर्ज छाननीत बाद, कारण...

Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या मैदानात स्वबळावर उतरलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला धक्का बसला आहे. काल उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता, तर आज राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या महिला शिलेदाराचा अर्ज छाननीदरम्यान बाद झाल्याची माहिती समोर आली आहे. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातून मनसेच्या उमेदावर प्रशंसा मनोज अंबेरे यांची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे. 

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याची मुदत काल संपली. त्यानंतर आजपासून सर्व उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. यामध्ये अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरलेल्या सौ. प्रशंसा मनोज अंबेरे यांचा अर्ज बाद झाला आहे. अंबेरे या अकोल्यातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला जिल्हाध्यक्षा आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी मनसेने 138 उमेदवार जाहीर केले होते, मात्र आता एक अर्ज बाद झाल्यामुळे मनसेचे 137 अधिकृत उमेदवार असतील.

अर्ज बाद होण्याचे कारण काय?
प्रशंसा अंबेरे यांनी आपल्या उमेदवारीचा रितसर अर्ज दाखल केला. मात्र तपासणीदरम्यान प्रशांत यांचा अर्ज रद्द करम्यात आला आहे. विधानसभा किंवा लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी वयाची किमान 25 वर्षे पूर्ण असावी लागतात. मात्र प्रशंसा अंबेरे यांचे वय 24 वर्षे असल्याचे समोर आले आहे. त्यांच्या प्रतिज्ञापत्रातही वयाचा उल्लेख आहे. त्यामुळे अवघ्या काही महिन्यांनी त्यांची संधी हुकली आहे. मनसेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

अकोल्यात काय चित्र?
अकोला पश्चिम मतदारसंघातून महायुतीतून भाजपचे विजय अगरवाल निवडणूक लढवत आहेत. तर, महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसकडून साजिद खान आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून राजेश मिश्रा अशा दोन्ही पक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 

Web Title: Big shock to Raj Thackeray, MNS candidate's application rejected from Akola