बारामतीची जनता हुशार; एका वाक्यात सुनेत्रा पवारांनी केले विरोधकांना गपगार...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 13:31 IST2024-11-23T13:29:33+5:302024-11-23T13:31:59+5:30
Baramati Assembly Election 2024 Result Live Updates: शरद पवारांनी अजित पवारांच्या विरोधात अजितदादांचा सख्खा पुतण्या युगेंद्र पवार यांना उतरविले होते. यामुळे निवडणूक अजित पवारांना जड जाईल असे वाटत होते.

बारामतीची जनता हुशार; एका वाक्यात सुनेत्रा पवारांनी केले विरोधकांना गपगार...
Baramati Assembly-Vidhan Sabha Election 2024 Result Live राष्ट्रवादी पक्ष कोणाचा हे आता जवळपास सिद्ध झाले आहे. शरद पवारांचे एक वक्तव्य बारामतीत व राज्यात त्यांनाच नडले आहे. राज्यसभेची टर्म संपली की निवृत्ती घेणार असल्याचे शरद पवारांनी सभेत म्हटले होते. नेमके तेच वाक्य अजित पवारांनी उचलले आणि जिकडे तिकडे शरद पवारांनंतर वाली कोण, या मुद्द्यावर प्रचार सुरु केला. याचा परिणाम असा झाला की बारामतीकरांनी अजित पवारांना प्रचंड मताधिक्याने निवडून दिले आहे.
शरद पवारांनी अजित पवारांच्या विरोधात अजितदादांचा सख्खा पुतण्या युगेंद्र पवार यांना उतरविले होते. यामुळे निवडणूक अजित पवारांना जड जाईल असे वाटत होते. परंतू, निकाल प्रत्यक्षात त्याचा परस्पर विरोधात आले आहेत. यावर अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार यांचे वक्तव्य आले आहे.
अजुन मतमोजणी सुरु आहे. अजित पवारांचे लीड लाखाच्या पुढे जाईल असा अंदाज सुनेत्रा पवारांनी व्यक्त केला आहे. बारामतीकरांनी दाखवून दिले बारामती हे दादांचे कुटुंब आहे. मी बारामतीच्या मायबाप जनतेचे मनापासुन आभार मानते. अजित पवारांच काम पाहुन जनता त्यांच्या मागे उभी राहिली. बारामतीची जनता हुशार आहे, असे पवार म्हणाल्या.