Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावर बुलढाणा, जालन्यात ९ दिवसांचा ब्लॉक; कोणत्या दिवशी कुठला रस्ता बंद? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 07:55 IST2026-02-07T07:53:11+5:302026-02-07T07:55:14+5:30

Samruddhi Mahamarg Block: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर ‘हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’अंतर्गत गॅन्ट्री उभारण्याचे काम हाती घेण्यात आल्याने बुलढाणा, जालन्यात ९ दिवसांचा ब्लॉक असणार आहे.

9-day block on Samruddhi mahamarg in Buldhana, Jalna; Which road will be closed on which day? | Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावर बुलढाणा, जालन्यात ९ दिवसांचा ब्लॉक; कोणत्या दिवशी कुठला रस्ता बंद? 

Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावर बुलढाणा, जालन्यात ९ दिवसांचा ब्लॉक; कोणत्या दिवशी कुठला रस्ता बंद? 

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्रसमृद्धी महामार्गावर ‘हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’अंतर्गत गॅन्ट्री उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार, सिंदखेडराजा व देऊळगावराजा, तसेच जालना तालुक्यात या गॅन्ट्री उभारल्या जाणार आहेत. या कामासाठी ९ ते १८ फेब्रुवारी या कालावधीत २१ टप्प्यांत वाहतूक ब्लॉक घेतले जाणार आहेत. ब्लॉकच्या कालावधीत महामार्गावरील संबंधित वाहिनीवरील वाहतूक पूर्णतः थांबविली जाणार आहे.

एमएसआरडीसीमार्फत हे काम किमी ३०० ते किमी ३६५ (नागपूरपासूनचे अंतर) दरम्यान केले जाणार आहे. यात प्रत्येक टप्प्यादरम्यान वाहतूक ४५ ते ६० मिनिटांसाठी बंद असेल. काम पूर्ण होताच वाहतूक पुन्हा पूर्ववत करण्यात येईल, असे एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

गॅन्ट्री उभारणी कामाचे वेळापत्रक

तारीखसाखळी क्र. (कि.मी)वाहिनी (बाजू)वेळ
९ फेब्रुवारी३००मुंबईदु. १२ ते दु. १
९ फेब्रुवारी३०० व ३०५नागपूरदु. ३ ते दु. ४
१० फेब्रुवारी३०५ व ३०८मुंबईदु. १२ ते दु. १
१० फेब्रुवारी३०८नागपूरदु. ३ ते दु. ४
११ फेब्रुवारी३१४ व ३१८मुंबईदु. १२ ते दु. १
१२ फेब्रुवारी३१८ व ३१९नागपूरदु. ३ ते दु. ४
१३ फेब्रुवारी३२५दोन्हीमुंबई (दु. १२-१) व नागपूर (दु. ३-४)
१४ फेब्रुवारी३३८मुंबईदु. १२ ते दु. १
१६ फेब्रुवारी३३९दोन्हीमुंबई (दु. १२-१) व नागपूर (दु. ३-४)
१७ फेब्रुवारी३५० व ३५९मुंबईदु. १२ ते दु. १
१७ फेब्रुवारी३५०नागपूरदु. ३ ते दु. ४
१८ फेब्रुवारी३५९ व ३६५मुंबईदु. ३ ते दु. ४
१८ फेब्रुवारी३६५नागपूरदु. १२ ते दु. १

Web Title : समृद्धि महामार्ग: बुलढाणा, जालना में 9 दिनों का ब्लॉक; सड़क बंद का कार्यक्रम

Web Summary : समृद्धि महामार्ग पर बुलढाणा और जालना में 9 से 18 फरवरी तक गैन्ट्री लगाने के लिए ट्रैफिक ब्लॉक। विशिष्ट अनुभागों पर 45-60 मिनट के बंद की उम्मीद है। प्रभावित मार्गों और समय के लिए शेड्यूल देखें।

Web Title : Samruddhi Mahamarg: 9-Day Block in Buldhana, Jalna; Road Closure Schedule

Web Summary : Traffic blocks on the Samruddhi Mahamarg in Buldhana and Jalna from February 9-18 for gantry installation. Expect 45-60 minute closures on specific sections. Check schedule for affected routes and times.