तुळजापुरला ज्योत आणण्यासाठी निघालेला भाविक अपघातात ठार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2022 07:56 IST2022-09-26T07:52:15+5:302022-09-26T07:56:23+5:30

दुचाकीला धडक  : औसा - तुळजापूर महामार्गावरील घटना

Devotee going to bring Jyot to Tuljapur killed in an accident | तुळजापुरला ज्योत आणण्यासाठी निघालेला भाविक अपघातात ठार 

तुळजापुरला ज्योत आणण्यासाठी निघालेला भाविक अपघातात ठार 

राजकुमार जोंधळे

औसा (जि. लातूर) : तुळजापूर येथून भवानी ज्योत आणण्यासाठी जाणाऱ्या दुचाकीला रविवारी सायंकाळी झालेल्या अपघातात चाकूर तालुक्यातील मसनेरवाडी येथील १६ वर्षीय भाविकाचा जागीच मृत्यू झाला तर अन्य एक जण जखमी झाल्याची घटना घडली.

घटस्थापनेला तुळजापूर येथून भवानी ज्योत आणण्याची मसनेरवाडी येथील गावची परंपरा आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही गावातील ५० जण टमटम आणि मोटारसायकलवर तुळजापूरकडे रविवारी निघाले होते. दरम्यान, रविवारी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास औसा - तुळजापूर महामागार्वरील शिवली मोडनजीक पाठीमागून येणाऱ्या ओमनी (एम.एच. १२ जी.के.३३८५)  वाहनाने मोटरसायला (एम.एच. २४ बी.पी.६४९२) जोराची धडक दिली. या अपघातात मोटारसायकलवरील लखन मल्हारी ताळकोटे (वय १६) हा चारचाकी वाहनाच्या चाकाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर देवा पिराजी ताळकोटे (वय १७) हा जखमी झाला आहे. मयताचे पार्थिव शवविच्छेदनासाठी औसा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत औसा पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत नोंद करण्याची प्रक्रिया सुरु होती.

 

Web Title: Devotee going to bring Jyot to Tuljapur killed in an accident