Kolhapur: ‘आरसीबी’च्या जल्लोषाला गालबोट, तरुणांची हुल्लडबाजी; किरकोळ जाळपोळ, पोलिस गाडीच्या काचा फोडल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 16:48 IST2025-06-05T16:48:21+5:302025-06-05T16:48:56+5:30

पोलिसांच्या अंगावर धावून जाण्याचाही प्रकार

Youths riot in Ichalkaranjit, Kolhapur during IPL winners RCB celebration Minor arson police vehicle window smashed | Kolhapur: ‘आरसीबी’च्या जल्लोषाला गालबोट, तरुणांची हुल्लडबाजी; किरकोळ जाळपोळ, पोलिस गाडीच्या काचा फोडल्या

Kolhapur: ‘आरसीबी’च्या जल्लोषाला गालबोट, तरुणांची हुल्लडबाजी; किरकोळ जाळपोळ, पोलिस गाडीच्या काचा फोडल्या

इचलकरंजी : आयपीएल सामन्यातील विजेतेपदाच्या जल्लोषासाठी शहरातील मलाबादे चौकात जमलेल्या तरुणांतील हुल्लडबाजांना रोखताना गालबोट लागले. तरुणाईच्या उत्साहाला आवर घालताना पोलिसांनी केलेल्या सौम्य लाठीमारानंतर संतप्त युवकांनी पोलिसांच्या अंगावर धावून जाण्याच्या प्रकारासह किरकोळ जाळपोळ, दगडफेक असे प्रकार केले. त्यामध्ये एका पोलिस गाडीच्या काचा फुटून नुकसान झाले. या प्रकारामुळे मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

आयपीएल सामन्यात रॉयल चँलेजर्स बंगळुरू संघाने विजेतेपद मिळविल्यानंतर त्याचा आनंद साजरा करण्यासाठी नेहमीप्रमाणे क्रिकेटप्रेमी तरुणाई रात्री बारा वाजण्याच्या सुमारास मलाबादे चौकात जमली. तेथे भागाभागांतून आलेल्या तरुणांनी जल्लोष सुरू केला. काही वेळानंतर काहीजणांकडून हुल्लडबाजीचे प्रकार सुरू झाले.

त्यामुळे काही अतिउत्साही युवकांना रोखण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार करीत पांगविण्यास सुरुवात केली. त्यामुळे वातावरण चिघळून तरुणांनी आणखी जोरात आरडाओरड करीत दगडफेक सुरू केली. तसेच काही महाभाग तर पोलिसांच्या अंगावर धावून गेले. या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी जादा कुमक मागविली. तोपर्यंत काहींनी किरकोळ जाळपोळीचे प्रकारही केले. कुमक आल्यानंतर युवकांना पांगविले.

Web Title: Youths riot in Ichalkaranjit, Kolhapur during IPL winners RCB celebration Minor arson police vehicle window smashed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.