Kolhapur: पिसाळलेला कुत्रा चावल्याने चंदगडच्या महिलेचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2024 11:45 IST2024-05-11T11:44:31+5:302024-05-11T11:45:05+5:30

कोल्हापूर : पिसाळलेला कुत्रा चावलेल्या रेणुका शंकर बागडी (वय ३४, रा. बेळेभाट, ता. चंदगड ) या महिलेचा उपचार सुरू ...

woman dies after being bitten by a crushed dog in Chandgad | Kolhapur: पिसाळलेला कुत्रा चावल्याने चंदगडच्या महिलेचा मृत्यू

Kolhapur: पिसाळलेला कुत्रा चावल्याने चंदगडच्या महिलेचा मृत्यू

कोल्हापूर : पिसाळलेला कुत्रा चावलेल्या रेणुका शंकर बागडी (वय ३४, रा. बेळेभाट, ता. चंदगड) या महिलेचा उपचार सुरू असताना दुर्दैवी मृत्यू झाला. तिला सीपीआरमध्ये शुक्रवारी दाखल केले होते. तिच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त झाली.

पोलिसांनी सांगितले की, रेणुका बागडी या बेळेभाट येथे राहत होत्या. १९ एप्रिलला त्या सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घराशेजारी बसल्या होत्या. त्या वेळी पिसाळलेल्या कुत्र्याने त्याचा चावा घेतला. चावा इतका जोराचा होता की, त्याच्या डोळ्याला मोठी जखम झाली. त्यांना नातेवाइकांनी गडहिंग्लज येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली. 

मात्र दोन दिवसांपूर्वी त्यांना पुन्हा ताप आला. नातेवाइकांनी त्यांना चंदगड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. मात्र पुढील उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्याचा सल्ला तेथील डॉक्टरांनी दिला. शुक्रवारी त्यांना सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांचे पती शंकर यांचे चार वर्षांपूर्वी निधन झाले आहे.

Web Title: woman dies after being bitten by a crushed dog in Chandgad