OBC reservation: ओबीसी आरक्षणाबाबत महाविकास आघाडी सरकार गप्प का? प्रवीण दरेकर यांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2022 20:47 IST2022-05-18T18:19:15+5:302022-05-18T20:47:49+5:30
Praveen Darekar, OBC reservation: मध्य प्रदेश सरकार ओबीसी आरक्षण देण्यासाठी सकारात्मक निर्णय घेऊ शकतय पण राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार गप्प का?असा सवाल विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केला.

OBC reservation: ओबीसी आरक्षणाबाबत महाविकास आघाडी सरकार गप्प का? प्रवीण दरेकर यांचा सवाल
चंदगड - मध्य प्रदेश सरकार ओबीसी आरक्षण देण्यासाठी सकारात्मक निर्णय घेऊ शकतय पण राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार गप्प का?असा सवाल विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केला. बुधवारी भाजपा नेते शिवाजीराव पाटील यांच्या इनाम सावर्डे (ता. चंदगड) येथील निवासस्थानी त्यांनी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर पुढे म्हणाले की, केवळ धनदांडग्यांसाठीच हे महाविकास आघाडी सरकार ओबीसी आरक्षणाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच मध्य प्रदेश सरकारने पूर्ण सोपस्कार करून ओबीसी आरक्षण दिले आहे. पण फक्त दिखाऊपणा करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने आता ओबासी आरक्षण मिळवून देऊन आपली भूमिका पार पाडावी, असा सल्लाही त्यांनी दिला.
शिवाजीराव आणखीन थोडा जोर लावा
चंदगड विधान मतदारसंघात खूप कमी काळात भाजपाची ताकद निर्माण करण्यात तुम्ही यशस्वी होत आहात. त्यामुळे आणखीन थोडा जोर लावा व हा विधानसभा मतदारसंघ भाजपाला मिळवून द्या यासाठी पक्ष तुमच्या सदैव पाठीशी असल्याचा कानमंत्रही भाजपा नेते शिवाजीराव पाटील यांना विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर देण्यास विसरले नाहीत.
यावेळी माजी रोहयो मंत्री भरमूआण्णा पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष नामदेव पाटील, जिल्हा सरचिटणीस रविंद्र बांदिवडेकर, सुरेश सातवणेकर, सुनील काणेकर, अशोक कदम, तुकाराम बेनके यासह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते. इनाम सावर्डे येथे विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचे स्वागत भाजपा नेते शिवाजीराव पाटील यांनी केले. यावेळी तालुकाध्यक्ष नामदेव पाटील, माजी रोहयो मंत्री भरमूआण्णा पाटील उपस्थित होते.