Ichalkaranji Municipal Election 2026: मूळ भाजपवाले कोठे आहेत, ते शोधा, सतेज पाटील यांनी लगावला टोला; इचलकरंजीतील पाणी प्रश्नावरुन दिलं थेट आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 18:25 IST2026-01-10T18:20:58+5:302026-01-10T18:25:03+5:30
इचलकरंजीची ओळख मॅँचेस्टर म्हणून आहे. ती ओळख पुसण्याचे काम सत्तेतील लोक करीत आहेत.

Ichalkaranji Municipal Election 2026: मूळ भाजपवाले कोठे आहेत, ते शोधा, सतेज पाटील यांनी लगावला टोला; इचलकरंजीतील पाणी प्रश्नावरुन दिलं थेट आव्हान
इचलकरंजी : कोल्हापूरला थेट पाईपलाईन आल्याशिवाय मी आमदारकी लढणार नाही, असा निर्णय मी घेतला होता, तशी गर्जना ते करू शकतात का?, असे आव्हान आमदार सतेज पाटील यांनी दिले. तसेच मूळ भाजपवाले कोठे आहेत? ज्यांनी काँग्रेसविरोधात संघर्ष केला, ते आता कोठे आहेत, ते शोधा, असा टोलाही लगावला.
शिव-शाहू विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ स्वामी अपार्टमेंट व शहापूर चौकातील जाहीर सभेत ते बोलत होते. आमदार पाटील म्हणाले, इचलकरंजीची ओळख मॅँचेस्टर म्हणून आहे. ती ओळख पुसण्याचे काम सत्तेतील लोक करीत आहेत. आठ-आठ दिवस पाणी येत नाही. आमदार होऊन एक वर्ष उलटले तरी पाण्याचा प्रश्न का सोडवला नाही? इतके दिवस पाण्याचा प्रश्न का सोडवला नाही? तुम्हाला झाडाला बांधून ठेवले होते का? जर तुम्ही पाणीप्रश्न सोडवला असता, तर आम्हाला पॅनलला उभा करायला माणसेसुद्धा मिळाली नसती.
वाचा: नेहरू-गांधींची काँग्रेस संपली; आता घर भरणारी काँग्रेस शिल्लक, शिवेंद्रराजे भोसले यांचा हल्लाबोल
शशांक बावचकर म्हणाले, मूलभूत प्रश्न हाताळण्याचे कामसुद्धा या नेत्यांनी केले नाही. आमदार बोले, आयुक्त डोले असे काम सुरू आहे. यावेळी माजी आमदार राजूबाबा आवळे, संजय कांबळे, उदयसिंह पाटील, सयाजी चव्हाण आदी उपस्थित होते.
वाचा: पक्षांचे पाच तर १३ अपक्ष रिंगणात; ९ माजी नगरसेवक, ३ माजी सभापती
आकड्याची चिठ्ठी
आमदार पाटील यांनी विरोधी पक्षातील उमेदवाराचा समाचार घेताना म्हणाले, ‘विरोधकांच्याबद्दल मी बोलत नाही, पॉम्पलेट वाटताना त्यांच्या खिशातून आकड्याची चिठ्ठी निघाली नाही म्हणजे मिळवलं.’