‘लोकमत’च्या सन्मानानं इचलकरंजीतील नगरसेविका भारावल्या, लोकांच्या विश्वासाला पात्र राहण्याची दिली ग्वाही 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 13:23 IST2026-01-21T13:22:37+5:302026-01-21T13:23:06+5:30

पुष्पगुच्छ, मिठाई व वाण देऊन सत्कार 

The newly elected corporators of Ichalkaranji Municipal Corporation were felicitated by Lokmat | ‘लोकमत’च्या सन्मानानं इचलकरंजीतील नगरसेविका भारावल्या, लोकांच्या विश्वासाला पात्र राहण्याची दिली ग्वाही 

छाया : उत्तम पाटील

इचलकरंजी : महापालिकेच्या पहिल्या सभागृहासाठी जनतेने आम्हाला निवडून देऊन आमच्यावर जो विश्वास दाखविला आहे, त्याला आम्ही कुठेही कमी पडणार नाही. ‘लोकमत’ने आमचा सत्कार केला. तसेच नवीन उपक्रम राबविण्याची प्रेरणा देत त्याच्या पाठीशी राहण्याची ग्वाही दिली. त्यासाठी आम्ही ‘लोकमत’चे आभारी आहोत, असे मत इचलकरंजी महापालिकेत निवडून आलेल्या नूतन नगरसेविकांनी व्यक्त केले.

इचलकरंजीतील घोरपडे नाट्यगृहात सर्व नूतन नगरसेविकांचा सत्कार ‘लोकमत’च्यावतीने केला. कार्यकारी संपादक सचिन जवळकोटे व महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांच्या हस्ते सर्वांचा पुष्पगुच्छ, मिठाई व वाण देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यकारी संपादक जवळकोटे म्हणाले, ‘लोकमत’ नेहमीच विश्वासार्ह बातम्यांच्या माध्यमातून समाजाचा आरसा म्हणून काम करते. समाजातील वेगळेपण ठामपणे मांडण्यासह चांगल्या कामांच्या पाठीशी राहतो. आपणही आपल्या भागात नवनवीन उपक्रम राबवावेत. त्याची प्रसिद्धी शहरापासून ते दिल्लीपर्यंत करण्यात ‘लोकमत’ तुमच्यासोबत राहील.

कार्यक्रमास सहायक आयुक्त विद्या कदम, रोशनी गोडे, मुख्य लेखापरीक्षक आरती खोत-पाटील, नगरसेविका रुपाली कोकणे, यास्मीन तासगावे, सरिता आवळे, मोनाली मांजरे, मनीषा कुपटे, वैशाली पोवार, जुलेखा पटेकरी, अलका स्वामी, किरण खवरे, विजया महाजन, संगीता आलासे, मनीषा नवनाळे, विद्या साळुंखे, नूतन मुथा, वैशाली मोहिते, सारिका पाटील, सुरेखा जाधव, स्नेहल रावळ, रुपाली सातपुते, शशिकला कवडे, मेघा भोसले, ज्योती पाटील, तेजश्री भोसले, पूनम माळी, अरुणा बचाटे, आदी उपस्थित होते.

‘लोकमत’ची सकारात्मक पत्रकारिता कौतुकास्पद आहे. चांगल्या कामांना पाठबळ देण्यासह विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून महिलांनाही प्रोत्साहन दिले जाते. नूतन महिला नगरसेविकांचा सत्कार केल्याने त्यांचा नक्कीच हुरूप वाढेल. शहराच्या विकासासाठी त्यांच्या हातून नक्कीच नवनवीन उपक्रम राबवले जातील. - पल्लवी पाटील, आयुक्त तथा प्रशासक

Web Title : लोकमत सम्मान से इचलकरंजी पार्षद उत्साहित, जन विश्वास का वादा

Web Summary : लोकमत द्वारा सम्मानित इचलकरंजी के नव निर्वाचित पार्षदों ने आभार व्यक्त किया और जन विश्वास बनाए रखने का संकल्प लिया। लोकमत ने नई पहल को प्रोत्साहित किया, शहर से दिल्ली तक समर्थन का वादा किया, जिससे पार्षदों का उत्साह और शहरी विकास के प्रति प्रतिबद्धता बढ़ी।

Web Title : Ichalkaranji Corporators Elated by Lokmat Honor, Pledge Public Trust

Web Summary : Newly elected Ichalkaranji corporators, honored by Lokmat, expressed gratitude and pledged to uphold public trust. Lokmat encouraged new initiatives, promising support from city to Delhi, boosting corporators' enthusiasm and commitment to urban development.