Municipal Election Results 2026: नगरपालिकेची महापालिका झाली, इचलकरंजीत भाजपने एकहाती सत्ता मिळवली
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 16:24 IST2026-01-16T16:23:21+5:302026-01-16T16:24:27+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता याठिकाणी रोड शो

Municipal Election Results 2026: नगरपालिकेची महापालिका झाली, इचलकरंजीत भाजपने एकहाती सत्ता मिळवली
इचलकरंजी: इचलकरंजी नगरपालिकेची महानगरपालिका झाल्यानंतर यंदा प्रथमच निवडून पार पडली. या निवडणुकीत भाजपने विरोधकांचा सुपडासाफ करत एकहाती सत्ता मिळवली आहे. त्यामुळे नव्यानेच स्थापन झालेल्या या महापालिकेत भाजपचा पहिला महापौर बसणार असल्याचे स्पष्ट झाले.
इचलकरंजीत महायुती विरुद्ध शिव-शाहू आघाडीतच दुरंगी लढत झाली. ६५ जागांसाठी २३० उमेदवार निवडणूक रिंगणात होते. महापालिकेचा पहिला महापौर आपला बनविण्यासाठी सर्वच पक्षांनी चांगलाच जोर लावला होता. याठिकाणी अनेक वर्षांपासूनचे विरोधक असलेले माजी मंत्री प्रकाश आवाडे व माजी आमदार सुरेश हाळवणकर एकत्र आले. तर महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये एकमत न झाल्याने शिव-शाहू आघाडी स्थापन झाली. निवडणूक प्रचारादरम्यान दोन्हीकडून जोरदार राळ उडली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा याठिकाणी रोड शो देखील झाला होता.
कोल्हापुरात काँग्रेसच स'तेज'; 'या' तीन प्रभागात 'पंजा'ची छाप, कुठं फुललं कमळ, धनुष्यबाणाच काय...वाचा
भाजपने याठिकाणी सर्वाधिक ४३ जागा जिंकल्या. तर विरोधी शिवशाहू आघाडीने १७ जागा मिळवल्या. शिंदेसेना, उद्धवसेनेबरोबरच राष्ट्रवादी अजित पवार गटानेही आपले खाते उघडले. शिंदेसेनेने ३, उद्धवसेना १ तर राष्ट्रवादी अजित पवार गटाने १ जागेवर विजयी मिळवला आहे.
दिग्गजांना धक्का
या निवडणुकीत अनेक दिग्गजांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुहास जांभळे, मंगला मुसळे, शिवशाहू आघाडीचे हिमानी चाळके, अब्रहम आवळे, शिंदेसेनेचे रवींद्र लोहार यांचा समावेश आहे.
विजयी उमेदवार असे
प्रभाग क्रमांक - १
अ- अनुसूचित जाती महिला
स्वाती राजेंद्र लोखंडे- शिव शाहू आघाडी
ब-ओबीसी
सचिन लालासो राणे - शिव शाहू आघाडी
क- सर्वसाधारण महिला
रूपाली नितीन कोकणे - शिव शाहू आघाडी
ड- सर्वसाधारण
उदयसिंग मारुती पाटील – शिव शाहू आघाडी
प्रभाग क्रमांक - २
अ- ओबीसी महिला
यास्मीन मुसा तासगावे - शिव शाहू आघाडी
ब- सर्वसाधारण महिला
पद्मा लक्ष्मण सावरतकर - शिव शाहू आघाडी
क- सर्वसाधारण
रणजीत गंगाराम जाधव - शिव शाहू आघाडी
ड - सर्वसाधारण
परवेझ लतिफ गैबान - शिव शाहू आघाडी
प्रभाग क्रमांक - ३
अ - अनुसूचित जाती महिला
प्रियंका प्रसाद इंगवले - भाजप
ब - ओबीसी
योगेश चांगदेव पाटील - भाजप
क- सर्वसाधारण महिला
सरिता भाऊसो आवळे - शिदेसेना
ड- सर्वसाधारण
अशोक रामचंद्र जांभळे - राष्ट्रवादी (अजित पवार)
प्रभाग क्रमांक - ४
अ - ओबीसी
सयाजी मारुती चव्हाण - शिव शाहू आघाडी
ब- सर्वसाधारण महिला
मोनाली दत्तात्रय मांजरे - भाजप
क - सर्वसाधारण महिला
मनीषा संतोष कुपटे - भाजप
ड- सर्वसाधारण
मनोज भीमाशंकर हिंगमिरे – भाजप
प्रभाग क्रमांक - ५
अ-ओबीसी
सतीश वसंतराव मुळीक - भाजप
ब - सर्वसाधारण महिला
वैशाली सुनिल पोवार - भाजप
क- सर्वसाधारण महिला
जुलेखा जहाँगीर पटेकरी - भाजप
ड- सर्वसाधारण
शिवाजी संभाजी पाटील - उद्धवसेना
प्रभाग क्रमांक - ६
अ- अनुसूचित जाती
अलका अशोक स्वामी - भाजप
ब - ओबीसी महिला
किरण श्रीरंग खवरे - भाजप
क - सर्वसाधारण महिला
विजया सुनिल महाजन - भाजप
ड - सर्वसाधारण
विठ्ठल पुंडलिक चौपडे - भाजप
प्रभाग क्रमांक - ७
अ- अनुसूचित जाती महिला
क्रांती अब्राहम आवळे - शिव शाहू आघाडी
ब - ओबीसी महिला
प्रमिला रविंद्र जावळे - भाजप
क - सर्वसाधारण
नंदकुमार आनंदराव पाटील - शिव शाहू आघाडी
ड - सर्वसाधारण
मदन सीताराम कारंडे - शिव शाहू आघाडी
प्रभाग क्रमांक - ८
अ- ओबीसी महिला
रूपा उदय बुगड - भाजप
ब - सर्वसाधारण महिला
संगीता राजू आलासे - शिव शाहू आघाडी
क - सर्वसाधारण
संजय शंकरराव तेलनाडे - शिव शाहू आघाडी
ड - सर्वसाधारण
रवींद्र वसंत माने - शिदेसेना
प्रभाग क्रमांक - ९
अ - अनुसूचित जाती
रुबेन सखाराम आवळे - भाजप
ब - ओबीसी महिला
ध्रुवती सदानंद दळवाई - भाजप
क - सर्वसाधारण महिला
मनीषा प्रशांत नवनाळे - भाजप
ड - सर्वसाधारण
उदय आनंदा धातुडे - भाजप
प्रभाग क्रमांक - १०
अ- अनुसूचित जाती
रवी साहेब रजपुते - भाजप
ब - ओबीसी महिला
विद्या मनोज साळुंखे - भाजप
क - सर्वसाधारण महिला
नूतन दिलीप मुथा - शिंदे सेना
ड - सर्वसाधारण
तानाजी बाळु पोवार - भाजप
प्रभाग क्रमांक ११
अ - ओबीसी
प्रदीप नामदेव धोत्रे - भाजप
ब - सर्वसाधारण महिला
वैशाली शशिकांत मोहिते - भाजप
क - सर्वसाधारण महिला
सारिका सुकुमार पाटील - भाजप
ड - सर्वसाधारण
राजू संभाजी बोद्रे - भाजप
प्रभाग क्रमांक - १२
अ - ओबीसी
नितेश किरण पोवार - भाजप
ब - सर्वसाधारण महिला
सुरेखा अजितमामा जाधव - भाजप
क - सर्वसाधारण महिला
स्नेहल दीपक रावळ - भाजप
ड - सर्वसाधारण
अनिल देवकरण डाळ्या - भाजप
प्रभाग क्रमांक - १३
अ - ओबीसी महिला
रूपाली अनंत सातपुते - भाजप
ब - सर्वसाधारण महिला
शशिकला माळसाकांत कवडे - भाजप
क - सर्वसाधारण
चंद्रकांत विष्णू शेळके - भाजप
ड - सर्वसाधारण
अमरजीत राजाराम जाधव - शिव शाहू आघाडी
प्रभाग क्रमांक - १४
अ - ओबीसी महिला
सपना प्रमोद भिसे - भाजप
ब - सर्वसाधारण महिला
मेघा शहाजी भोसले - भाजप
क - सर्वसाधारण
अभिषेक रमाकांत वाळवेकर - भाजप
ड - सर्वसाधारण
ओंकार रामचंद्र सुर्वे - भाजप
प्रभाग क्रमांक - १५
अ - ओबीसी
राजू आण्णासो पुजारी - भाजप
ब - सर्वसाधारण महिला
ज्योती नागेश पाटील - भाजप
क - सर्वसाधारण महिला
तेजश्री अमृत भोसले - भाजप
ड - सर्वसाधारण
संतोष बाबुराव शेळके - भाजप
प्रभाग क्रमांक - १६
अ - ओबीसी महिला
पूनम सचिन माळी - भाजप
ब - ओबीसी
सुशांत बाळासो कलागते - भाजप
क - सर्वसाधारण महिला
स्मिता संजय तेलनाडे - शिव शाहू आघाडी
ड - सर्वसाधारण महिला
अरुणा प्रमोद बचाटे - भाजप
इ - सर्वसाधारण
सुनील शंकरराव तेलनाडे - शिव शाहू आघाडी