कोल्हापूर: चंदगड तालुक्यातील मजरे कारवे येथे कार नदीत कोसळली
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2022 18:12 IST2022-07-15T18:10:51+5:302022-07-15T18:12:45+5:30
निंगाप्पा बोकडे चंदगड : समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार नदीत कोसळली. चंदगड तालुक्यातील मजरे कारवे ...

कोल्हापूर: चंदगड तालुक्यातील मजरे कारवे येथे कार नदीत कोसळली
निंगाप्पा बोकडे
चंदगड : समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कारनदीत कोसळली. चंदगड तालुक्यातील मजरे कारवे नजीकच्या हांजहोळ नदीवरील पुलावर आज, शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. नशीब बलवत्तर म्हणून कारमधील दोघेही सुखरूप बचावले.
कल्लाप्पा बाणेक आणि त्यांची पत्नी कारमधून प्रवास करत होते. यावेळी मजरे कारवे नजीक त्यांच्या कार समोर दुचाकी आली. या दुचाकीस्वारास वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार हांजहोळ नदीत कोसळली. तडशिनहाळचे उपसरपंच रामलिंग गुरव यांच्या प्रसंगवधानामुळे कारमधील दोघांचेही प्राण वाचले. कार नदीत कोसळल्याने बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.