Hatkanangle LokSabha Constituency: सत्यजित पाटील यांचा साधेपणाने उमेदवारी अर्ज दाखल

By भीमगोंड देसाई | Published: April 16, 2024 02:22 PM2024-04-16T14:22:13+5:302024-04-16T14:23:54+5:30

जयंत पाटील, राजूबाबा आवळे, मानसिंग नाईक यांची प्रमुख उपस्थिती

Satyajit Patil-Sarudkar from Mahavikas Aghadi for Hatkanangale Lok Sabha Constituency filed his candidature without any show of strength | Hatkanangle LokSabha Constituency: सत्यजित पाटील यांचा साधेपणाने उमेदवारी अर्ज दाखल

Hatkanangle LokSabha Constituency: सत्यजित पाटील यांचा साधेपणाने उमेदवारी अर्ज दाखल

कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीतून माजी आमदार सत्यजित पाटील - सरूडकर यांनी मंगळवारी निवडणूक निर्णय अधिकारी संजय शिंदे यांच्याकडे साधेपणाने उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आमदार जयंत पाटील, कँाग्रेसचे आमदार राजूबाबा आवळे, शिराळयाचे आमदार मानसिंगराव नाईक, उध्दवसेनेचे उपनेते संजय पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

माजी आमदार पाटील यांना उध्दवसेनेकडून हातकणंगलेतून महाविकास आघाडीतून उमेदवारी दिली आहे. अनपेक्षितपणे त्यांना उमेदवारी दिल्याने हातकणंगलेत लढत वाढली आहे. त्यांनी कोणत्याही प्रकारचे शक्तीप्रदर्शन न करता मोजकेचे कार्यकर्ते आणि नेत्यांसह उमेदवारी अर्ज दाखल केला. जिल्हा परिषद बांधकाम सभापती हंबीराव पाटील हे त्यांच्या अर्जला सूचक आहेत. अर्ज दाखल करताना हातकणंगले मतदारसंघातील तीन मतदार आणि उध्दवसेनेचे पवार उपस्थित होते.

Web Title: Satyajit Patil-Sarudkar from Mahavikas Aghadi for Hatkanangale Lok Sabha Constituency filed his candidature without any show of strength

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.