Hatkanangle Lok Sabha Constituency: साखरपुडा झाला पण लग्न झालं नाही; सतेज पाटील यांची मिश्किल टिपण्णी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2024 16:43 IST2024-04-04T16:41:35+5:302024-04-04T16:43:19+5:30
कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडे पाठिंबा मागितला होता. ...

Hatkanangle Lok Sabha Constituency: साखरपुडा झाला पण लग्न झालं नाही; सतेज पाटील यांची मिश्किल टिपण्णी
कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडे पाठिंबा मागितला होता. मात्र यावर तोडगा न निघाल्याने उद्धव ठाकरे गटाने याठिकाणी सत्यजित पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. यामुळे या मतदारसंघात आता चौरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यावर काँग्रेस नेते, आमदार सतेज पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.
सतेज पाटील म्हणाले, की ही जागा शिवसेनेच्या वाट्याची असल्याने त्यांनी निर्णय घ्यावा हे अपेक्षित आहे. राजू शेट्टींच्या चर्चेला अंतिम स्वरूप देता आले नाही. या मतदारसंघात महाविकास आघाडीची ताकद आहे. राजू शेट्टी यांनी आमच्यासोबत यावे, अशी आमची इच्छा होती. मात्र, साखरपुडा झाला पण लग्न झालं नाही असे मिश्किलपणे टिपण्णी सतेज पाटील यांनी केली.
सांगलीवर तोडगा निघेल
महाविकास आघाडीमध्ये सांगलीच्या जागेवरून तिढा निर्माण झाला आहे. याठिकाणी ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजी आहे. याबाबत बोलताना पाटील यांनी विश्वजित कदम यांचा या जागेसाठी प्रामाणिक प्रयत्न असून त्यांची नाराजी स्वाभाविक असल्याचे सांगत यावर वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असून लवकर या संदर्भातील तोडगा निघेल अशी आशा व्यक्त केली.
शक्तीपीठ महामार्ग ठेकेदार धार्जिण
शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांमधून तीव्र विरोध सुरु आहे. यावर बोलताना पाटील यांनी सरकार टीका केली. ठेकेदार धार्जिण हा मार्ग असून शेतकऱ्यांना उध्वस्त करण्यासाठी हा मार्ग केला जात असल्याचे ते म्हणाले. कोल्हापूर धाराशिव जिथून हा महामार्ग जात आहे तेथील शेतकऱ्यांचा मोठा विरोध आहे, त्यामुळे हा महामार्ग रद्द करून पर्यायी मार्गांचा विचार केला पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले. या महामार्गावर पैसे खर्च करण्यापेक्षा तीर्थक्षेत्रावर पैसे खर्च करा अशी मागणीही पाटील यांनी यावेळी केली.