Kolhapur: चंदगड पुलावर पाणी, गोव्याची वाहतूक बंद; १४ बंधारे पाण्याखाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 13:47 IST2025-06-26T13:46:56+5:302025-06-26T13:47:16+5:30

कोवाडला पुराचा धोका वाढला 

Road to Goa closed for traffic due to water inundation on Chandgad Bridge | Kolhapur: चंदगड पुलावर पाणी, गोव्याची वाहतूक बंद; १४ बंधारे पाण्याखाली

Kolhapur: चंदगड पुलावर पाणी, गोव्याची वाहतूक बंद; १४ बंधारे पाण्याखाली

चंदगड : मुसळधार पावसाची संततधार बुधवारी सुरूच राहिल्याने घटप्रभा नदीवरील ७ तर ताम्रपर्णी नदीवरील ७ असे एकूण १४ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. चंदगड पुलावर पाणी आल्याने गोव्याकडे जाणारा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला असून, माडवळे, जंगमहट्टी, तेऊरवाडीत पडझड होऊन १ लाख ४३ हजारांचे नुकसान झाले आहे. कोवाडच्या जुन्या पुलावर पाणी आल्याने बाजारपेठेला पुराचा धोका वाढला आहे.

रविवारपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असून, फाटकवाडी, जांबरे धरणातून विसर्ग सुरू असून, घटप्रभा नदीवरील पिळणी, तारेवाडी, कानडी-सावर्डे, अडकूर, कानडेवाडी, बिजूर-भोगोली, हिंडगाव, तर ताम्रपर्णी नदीवरील कोवाड, कुर्तनवाडी, हल्लारवाडी, माणगाव, शिप्पूर, चंदगड व कोकरे हे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. चंदगड पुलावर पाणी आल्याने गोव्याला जाणारा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

माडवळे येथे विठ्ठल निंगो गावडे यांची विहीर कोसळून ७० हजार, जंगमहट्टीत दौलत मरगू कांबळे यांची घराची भिंत कोसळून २८ हजार, तेऊरवाडीत सहदेव लक्ष्मण बुच्चे यांच्या घराची भिंत कोसळून ४५ हजारांचे नुकसान झाले आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, शेतीची कामे ठप्प झाली आहेत.

Web Title: Road to Goa closed for traffic due to water inundation on Chandgad Bridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.