Kolhapur Municipal Election: अवघ्या दीड तासात काढले ८१ जागांचे आरक्षण, १७ पासून हरकती दाखल करण्याची प्रक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 14:20 IST2025-11-12T14:17:48+5:302025-11-12T14:20:33+5:30
ओबीसीच्या २१ पैकी ११ जागा महिलांना

छाया-नसीर अत्तार
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठीची प्रभागनिहाय आरक्षण सोडत मंगळवारी शासकीय विश्रामगृहावरील राजर्षी शाहू सभागृहात काढण्यात आली. सकाळी ११ वाजता सुरू झालेली ही प्रक्रिया १२ वाजून ३० मिनिटांनी अवघ्या दीड तासात संपवत २० प्रभागांमधील ८१ जागांचे आरक्षण जाहीर करण्यात आले. आरक्षणाबाबतची प्रक्रिया अधिक सुस्पष्टपणे राबविण्यात आल्यामुळे विनाअडथळा ही प्रक्रिया पार पडली. येत्या १७ ते २४ नोव्हेंबरपर्यंत इच्छुकांना आरक्षणाबाबत हरकती दाखल करता येणार आहेत.
प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांच्या उपस्थितीत महापालिकेच्या कसबा बावडा येथील शाळा क्रमांक ११ मधील पाच मुलांच्या हस्ते आरक्षण सोडत काढण्यात आली. अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त परितोष कंकाळ, किरणकुमार धनवाडे, सहायक आयुक्त उज्ज्वला शिंदे, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, नगरसचिव सुनील बिद्रे, निवडणूक अधीक्षक सुधाकर चल्लावाड यांनी ही प्रक्रिया राबवली.
सुरुवातीला अनुसूचित जातीच्या जागांवरील आरक्षण सोडत काढण्यात आली. लोकसंख्येनुसार ११ प्रभागांतील प्रत्येकी एक जागा ही अनुसूचित जातीसाठी थेट राखीव ठेवण्यात आले. यामध्ये प्रभाग क्रमांक ४, १८, १७, १३, १५, १, ११, १९, २, ६ व २० या प्रभागांतील एक जागा अनुसूचित जातीसाठी थेट राखीव ठेवले. यामध्ये महिलांसाठीचे सहा जागांचे आरक्षण चिठ्ठीद्वारे काढण्यात आले. यात प्रभाग क्रमांक ४, ११, १३, १७, १८ व २० या प्रभागातील प्रत्येकी एका जागेवर अनुसूचित जाती महिलांसाठीची चिठ्ठी निघाल्याने या जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या.
आरक्षणानंतरचे चित्र असे :
१. सर्वसाधारण गटासाठी ४९ जागा असून, त्यामध्ये २४ महिलांचा समावेश आहे.
२. नागरिकांचा मागास प्रवर्ग हे आरक्षण २१ जागांवर जाहीर झाले असून, यामध्ये ११ महिला निवडणुकीच्या रिंगणात असतील.
३. अनुसूचित जातीसाठी ११ जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. यात सहा जागांवर महिलांना संधी मिळणार आहे.
असा आहे हरकत, सूचना दाखल करण्याचा कार्यक्रम
- १७ नोव्हेंबर-आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध करण्यात येणार
- १७ ते २४ नोव्हेंबर - आरक्षणाबाबत हरकती, सूचना सादर करता येणार
- हरकती दाखल करण्याचे ठिकाण - महापालिका (छत्रपती ताराराणी सभागृह)
ओबीसीच्या २१ पैकी ११ जागा महिलांना
महापालिकेच्या २० प्रभागांमध्ये २१ जागा या नागरिकांचा मागसवर्ग प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आल्या. प्रभाग क्रमांक २० हा पाचसदस्यीय असल्याने तेथील एक जागा या प्रवर्गासाठी थेट राखीव ठेवली. २१ पैकी ११ जागा महिलांसाठी सोडण्यात आल्या. त्यानंतर महिलांसाठीचे आरक्षण जाहीर केले. ज्या प्रभागात ‘नामाप्र’मधील दोन जागा राखीव आहेत. त्यांतील एक जागा महिलांसाठी थेट राखीव केली. त्यानुसार प्रभाग क्रमांक २० मधील २०-ब ही जागा थेट राखीव केली. शिवाय, ज्या प्रभागामध्ये एक किंवा अधिक जागा अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत. मात्र, त्या महिलांसाठी राखीव नाहीत, अशा प्रभागांमध्ये नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या सहा जागा महिलांसाठी थेट राखीव करण्यात आल्या. यामध्ये प्रभाग क्रमांक १, २, ६, १५, १९ व २० मधील प्रत्येकी एक जागा थेट राखीव केली. याच प्रवर्गामध्ये उर्वरित पाच जागांसाठी चिठ्ठीद्वारे सोडत काढली. यात प्रभाग क्रमांक ८, ११, १३, १४ व १८ या प्रभागांमधील जागांवर महिलांचे आरक्षण निघाले.
असे आहे प्रभागनिहाय आरक्षण
प्रभाग क्रमांक : अ : ब : क : ड
१ : अनुसूचित जाती : नागरिकांचा मागार्स प्रवर्ग (महिला) : सर्वसाधारण (महिला) : सर्वसाधारण
२ : अनुसूचित जाती : नागरिकांचा मागार्स प्रवर्ग (महिला) : सर्वसाधारण (महिला) : सर्वसाधारण ३ : नागरिकांचा मागास प्रवर्ग : सर्वसाधारण (महिला) : सर्वसाधारण (महिला) : सर्वसाधारण
४ : अनुसूचित जाती (महिला) : नागरिकांचा मागास प्रवर्ग : सर्वसाधारण (महिला) : सर्वसाधारण
५ : नागरिकांचा मागास प्रवर्ग : सर्वसाधारण (महिला) : सर्वसाधारण (महिला) : सर्वसाधारण
६ : अनुसूचित जाती : नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) : सर्वसाधारण (महिला) : सर्वसाधारण
७ : नागरिकांचा मागास प्रवर्ग : सर्वसाधारण (महिला) : सर्वसाधारण (महिला) : सर्वसाधारण
८ : नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) : सर्वसाधारण (महिला) : सर्वसाधारण : सर्वसाधारण
९ : नागरिकांचा मागास प्रवर्ग : सर्वसाधारण (महिला) : सर्वसाधारण (महिला) : सर्वसाधारण
१० : नागरिकांचा मागास प्रवर्ग : सर्वसाधारण (महिला) ; सर्वसाधारण (महिला) : सर्वसाधारण
११ : अनुसूचित जाती (महिला) : नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) : सर्वसाधारण : सर्वसाधारण
१२ : नागरिकांचा मागास प्रवर्ग : सर्वसाधारण (महिला) : सर्वसाधारण (महिला) : सर्वसाधारण
१३ : अनुसूचित जाती (महिला) : नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) : सर्वसाधारण : सर्वसाधारण
१४ : नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) : सर्वसाधारण (महिला) : सर्वसाधारण : सर्वसाधारण
१५ : अनुसूचित जाती : नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) : सर्वसाधारण (महिला) :सर्वसाधारण
१६ : नागरिकांचा मागास प्रवर्ग : सर्वसाधारण (महिला) : सर्वसाधारण (महिला) : सर्वसाधारण
१७ : अनुसूचित जाती (महिला) : नागरिकांचा मागास प्रवर्ग : सर्वसाधारण (महिला) : सर्वसाधारण
१८ : अनुसूचित जाती (महिला) : नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) : सर्वसाधारण : सर्वसाधारण
१९ : अनुसूचित जाती : नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) : सर्वसाधारण (महिला) : सर्वसाधारण
२० : अनुसूचित जाती (महिला) : नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) : नागरिकांचा मागास प्रवर्ग : सर्वसाधारण
: ई : सर्वसाधारण : - : - : महिला