मोटरसायकल ट्रॅक्टर धडकेत पादचारी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 10:45 IST2021-03-22T10:44:25+5:302021-03-22T10:45:52+5:30

Accident ichalkaranji kolhapur- शहापूर (ता.हातकणंगले) येथील मलाबादेनगर येथे पादचाऱ्यास मोटारसायकलस्वाराने धडक दिली. त्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. सुशांत दिनकर टिंबुगडे (वय २७, रा. मलाबादेनगर, शहापूर) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी मोटरसायकलस्वरास शहापूर पोलिसांनी ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. हा अपघात रविवारी रात्री साडेसातच्या सुमारास घडला.

Pedestrian killed in motorcycle-tractor collision | मोटरसायकल ट्रॅक्टर धडकेत पादचारी ठार

मोटरसायकल ट्रॅक्टर धडकेत पादचारी ठार

ठळक मुद्देमोटरसायकल ट्रॅक्टर धडकेत पादचारी ठारमोटरसायकलस्वरास शहापूर पोलिसांनी घेतले ताब्यात

इचलकरंजी : शहापूर (ता.हातकणंगले) येथील मलाबादेनगर येथे पादचाऱ्यास मोटारसायकलस्वाराने धडक दिली. त्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. सुशांत दिनकर टिंबुगडे (वय २७, रा. मलाबादेनगर, शहापूर) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी मोटरसायकलस्वरास शहापूर पोलिसांनी ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. हा अपघात रविवारी रात्री साडेसातच्या सुमारास घडला.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पंचगंगा फॅक्टरी रोड ते मलाबादेनगर या मार्गावर सुशांत हा दुधाची किटली घेवून गो-शाळेतील दूध आणण्यास निघाला होता. त्यावेळी समोरून आलेल्या मोटारसायकल ( एम एच ०९ सी एन ६३१३ ) ने त्याला धडक दिली. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याचवेळी तेथून ऊस भरून निघालेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीसही त्याचा धक्का लागल्याची चर्चा सुरू होती.

घटनास्थळी वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनास्थळा वरून सुशांत यास आय.जी.एम रुग्णालयात नेण्यात आले मात्र, त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. रुग्णालयात स्थानिक नगरसेवक किसन शिंदे, मित्र परिवार व नातेवाइकांनी गर्दी केली होती. सुशांत यांचा विवाह झाला असून, त्यांना सात महिन्यांचा मुलगा आहे.

दरम्यान, रात्री उशिरा मोटारसायकल व चालक तसेच उसाने भरलेला ट्रॅक्टर (एम एच २१ किव्ह १६७४) , ट्रॉली (एम एच २३ किव्ह ३८१८) व ट्रॉली (एम एच २३ किव्ह ३८१९) सह चालकासही ताब्यात घेतले आहे.
 

Web Title: Pedestrian killed in motorcycle-tractor collision