Kolhapur: इचलकरंजी महापालिकेच्या आयुक्तपदी पल्लवी पाटील, दिवटे मॅटमध्ये गेल्याने नियुक्तीला मिळाली होती स्थगिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 13:54 IST2025-02-14T13:51:54+5:302025-02-14T13:54:18+5:30
अतुल आंबी इचलकरंजी : येथील महापालिकेचे आयुक्त म्हणून पल्लवी पाटील यांनी पदभार स्वीकारला. त्यासाठी त्यांना तब्बल आठ महिने वाट ...

Kolhapur: इचलकरंजी महापालिकेच्या आयुक्तपदी पल्लवी पाटील, दिवटे मॅटमध्ये गेल्याने नियुक्तीला मिळाली होती स्थगिती
अतुल आंबी
इचलकरंजी : येथील महापालिकेचे आयुक्त म्हणून पल्लवी पाटील यांनी पदभार स्वीकारला. त्यासाठी त्यांना तब्बल आठ महिने वाट पहावी लागली.
महापालिकेचे आयुक्त म्हणून ओमप्रकाश दिवटे कार्यरत होते. आठ महिन्यांपूर्वी पाटील या महापालिकेचे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी दिवटे हे मॅटमध्ये गेले होते. त्यामुळे पाटील यांच्या नियुक्तीला स्थगिती मिळाली होती.
वाचा- आवाडेंशी वाद भोवला, इचलकरंजी महापालिका प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांचा पदाचा कार्यभार काढला
दिवटे यांनी मॅटमधून माघार घेऊन गुरूवार (दि.१३) पासून दिर्घमुदतीच्या रजेवर गेले आहेत. दिवटे यांनी माघार घेतल्याने शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास पल्लवी पाटील यांनी पदभार स्वीकारला. त्यांचे स्वागत उपायुक्त स्मृती पाटील यांनी केले.
वाचा- इचलकरंजी आयुक्तांच्या एका खुर्चीवर दोन आयुक्त
सामान्य नागरिकांच्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी ही संस्था आहे. त्यामुळे समस्यांच्या सोडवणुकीला प्राधान्य देणार असून, नागरिक व महापालिका यांच्यामध्ये समन्वय साधून शहराची प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न करणार असल्याचे नूतन आयुक्त पाटील यांनी सांगितले.