Kolhapur Municipal Election 2026: शिंदेसेनेतून आमदार पुत्र, माजी आमदार पुत्र, पुतणे यांच्यासह ३० जण रिंगणात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 12:39 IST2025-12-31T12:38:39+5:302025-12-31T12:39:40+5:30
कसबा बावड्यात एकाच चिन्हासाठी सर्व उमेदवार शिंदेसेनेचे..

Kolhapur Municipal Election 2026: शिंदेसेनेतून आमदार पुत्र, माजी आमदार पुत्र, पुतणे यांच्यासह ३० जण रिंगणात
कोल्हापूर : महापालिका निवडणुकीत महायुती आघाडीतील शिंदे सेनेने उमेदवारांची अधिकृत यादी मंगळवारी दुपारी प्रसिद्ध केली. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, माजी आमदार जयश्री जाधव यांचे पुत्र, पुतणे तर काँग्रेसमधून शिंदेसेनेत प्रवेश केलेल्यांनाही उमेदवारी मिळाली आहे. महायुतीने एकत्रितपणे उमेदवारांची यादी जाहीर करण्यापूर्वीच शिंदेसेनेने प्रभागनिहाय आपले उमेदवार जाहीर करण्यात बाजी मारली.
महायुतीत शिंदेसेना आणि भाजपमध्ये उमेदवारीवरून जोरदार रस्सीखेच झाली. उमेदवारीच्या जागेच्या तडजोडीत शिंदेसेनेच्या अनेक निष्ठावंतांना महायुतीतून उमेदवारी मिळाली नसल्याचे स्पष्ट झाले. याउलट निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधून पक्षप्रवेश केलेले शारंगधर देशमुख, आश्कीन आजरेकर, अशोक जाधव यांच्या पत्नी, प्रकाश नाईकनवरे, अजय इंगवले, सत्यजित जाधव, अभिजीत खतकर, ओंकार जाधव यांना उमेदवारी मिळाली. अजित पवार राष्ट्रवादीतून आलेल्या अनुराधा खेडकर, शिवतेज खराडे यांना उमेदवारी मिळाली. यांना संधी मिळाल्याने या जागांवर निष्ठावंत इच्छुक शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांना रिंगणातून बाहेर राहावे लागले.
वाचा : ‘जनसुराज्य’चे पाच म्हणता पंचवीस उमेदवार रिंगणात
कसबा बावड्यात एकाच चिन्हासाठी सर्व उमेदवार शिंदेसेनेचे..
कसबा बावडा परिसर असलेल्या प्रभाग क्रमांक एक आणि दोनमधील सर्व आठही जागांवर शिंदेसेनेचे उमेदवार रिंगणात उतरले आहेत. येथे महायुतीमधील भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या इच्छुकांना शिंदेसेनेतून संधी देण्यात आली आहे. काँग्रेसचे चिन्ह सलग असेल मग महायुतीची दोन चिन्हे झाल्यास संभ्रम होईल म्हणून महायुतीने ही दक्षता घेतली आहे.
माजी नगरसेवकांच्या नातेवाईकांना उमेदवारी
माजी नगरसेवक अशोक जाधव यांच्या पत्नी, माजी महापौर सुनील कदम यांचे पुत्र, माजी महापौर सरिता मोरे यांचे पती नंदकुमार, माजी नगरसेवक रमेश पोवार यांच्या पत्नी संगीता असे अनेक माजी नगरसेवकांच्या नातेवाईकांना उमेदवारी मिळाली आहे.
प्रभागनिहाय शिंदेसेनेचे उमेदवार असे :
प्रभाग एक : अमर भगवान साठे (अनुसूचित जाती) , गीता अशोक जाधव (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला), प्रियांका प्रदीप उलपे (सर्वसाधारण महिला), कृष्णा दिलीप लोंढे (सर्वसाधारण).
प्रभाग दोन : वैभव दिलीप माने (अनुसूचित जाती), अर्चना उमेश पागर (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला), प्राजक्ता अभिषेक जाधव ( सर्वसाधारण महिला) , स्वरूप सुनील कदम (सर्वसाधारण).
प्रभाग चार : शुभांगी रमेश भोसले (अनुसूचित जाती महिला), सुनीता मारूती माने (सर्वसाधारण महिला) .
प्रभाग पाच : अनिल हिंदूराव अधिक ( नागरिकांचा मागास प्रवर्ग), समीर सदाशिव यवलुजे (सर्वसाधारण) .
प्रभाग सहा : शीला अशोक सोनुले (अनुसूचित जाती), नंदकुमार बाळकृष्ण मोरे (सर्वसाधारण).
प्रभाग सात : मंगल महादेव साळोखे ( सर्वसाधारण महिला) , ऋतुराज राजेश क्षीरसागर (सर्वसाधारण) .
प्रभाग आठ : अनुराधा सचिन खेडकर ( नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला), शिवतेज इंद्रजीत खराडे (सर्वसाधारण).
प्रभाग नऊ : संगीता संजय सावंत (सर्वसाधारण महिला) , शारंगधर वसंतराव देशमुख (सर्वसाधारण) .
प्रभाग दहा : अजय पांडुरंग इंगवले (नागरिकांचा मागास प्रवर्ग) .
प्रभाग अकरा : सत्यजित चंद्रकांत जाधव (सर्वसाधारण) .
प्रभाग बारा : आश्किन गणी आजरेकर (नागरिकांचा मागास प्रवर्ग) , संगीता रमेश पोवार (सर्वसाधारण महिला).
प्रभाग तेरा : ओंकार संभाजीराव जाधव (सर्वसाधारण ).
प्रभाग चौदा : प्रकाशराव रामचंद्र नाईकनवरे (सर्वसाधारण), अजित जयसिंगराव मोरे ( अजित मोरे) .
प्रभाग पंधरा : दुर्गेश उदयराव लिंग्रस (सर्वसाधारण) .
प्रभाग अठरा : कौसर इस्माईल बागवान (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला).
प्रभाग वीस : अभिजित शामराव खतकर ( सर्वसाधारण)