Kolhapur Politics: महायुतीने सुनील मोदींच्या नावाला विरोध करण्याची तयारी केली; चंद्रकांतदांदांचा फोन आला..मोदींचा मार्ग सुकर झाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 12:33 IST2026-02-21T12:30:45+5:302026-02-21T12:33:16+5:30

आठ जणांची स्वीकृत सदस्यपदी निवड 

Minister Chandrakant Patil's message to the caretaker corporators of the Mahayuti not to oppose them cleared the way for Sunil Modi to be accepted as a corporator | Kolhapur Politics: महायुतीने सुनील मोदींच्या नावाला विरोध करण्याची तयारी केली; चंद्रकांतदांदांचा फोन आला..मोदींचा मार्ग सुकर झाला

Kolhapur Politics: महायुतीने सुनील मोदींच्या नावाला विरोध करण्याची तयारी केली; चंद्रकांतदांदांचा फोन आला..मोदींचा मार्ग सुकर झाला

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकांच्या यादीत काँग्रेस-उद्धवसेनेकडून सुनील मोदी यांच्या नावाच्या प्रस्तावाला महायुतीकडून महापालिका सभागृहात विरोध होण्याची शक्यता होती. मात्र, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विरोध करू नका, असा निरोप महायुतीतील कारभारी नगरसेवकांना दिल्याने सुनील मोदी यांचा ‘स्वीकृत नगरसेवक’पदाचा मार्ग सुकर झाला.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत महायुतीकडून पाच तर काँग्रेस-उद्धवसेनेकडून तीन जणांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड झाली. गतवेळच्या सभागृहात माजी महापौर सुनील कदम यांच्या स्वीकृत सदस्य निवडीवर तत्कालीन महाविकास आघाडीने आक्षेप घेतला होता. त्याचे उट्टे काढण्यासाठी महायुतीने सुनील मोदी यांच्या नावाला विरोध करण्याची तयारी चालविली होती.

वाचा: स्विकृत नगरसेवकपदावरून खडाजंगी; मोदी-देवकुळे यांच्यात वाद उफाळला, सुनील मोदी म्हणाले..

शुक्रवारी सर्वसाधारण सभेत स्वीकृत सदस्यांच्या निवडीवेळी मोदी यांच्या नावाला महायुतीकडून विरोध होईल अशी शक्यता असताना महायुतीने मात्र, त्यांच्या नावाला आक्षेप घेतला नाही. सर्वसाधारण सभा सुरू होण्यापूर्वी महायुतीच्या नगरसेवकांची बैठक झाली. या बैठकीवेळी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी फोन करून मोदी यांच्या नावाला आक्षेप न घेण्याच्या सूचना कारभारी नगरसेवकांना दिल्या. त्यामुळे मोदी यांची विनासायास स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड झाली.

हे झाले स्वीकृत नगरसेवक

काँग्रेस : सुनील मोदी, राहुल माने, मुश्ताक मलबारी.
भाजप : सुनील वाडकर, विजय जाधव, प्रा.जयंत पाटील
शिंदेसेना : रत्नेश शिरोळकर, प्रसाद चव्हाण.

स्वीकृत नगरसेवकांनी उधळला गुलाल

सर्वसाधारण सभेत स्वीकृत आठ नगरसेवकांच्या नावाला एकमताने मंजुरी दिली. त्यानंतर स्वीकृत नगरसेवकांनी महापालिकेच्या चौकात फटाक्यांची आतषबाजी करून गुलालाची उधळण केली तसेच आपापल्या प्रभागात मिरवणूक काढली.

Web Title : कोल्हापुर राजनीति: महायुति के समर्थन से सुनील मोदी का रास्ता आसान।

Web Summary : चंद्रकांत पाटिल के हस्तक्षेप से कोल्हापुर में सुनील मोदी का पार्षद के रूप में निर्विरोध चयन सुनिश्चित हुआ। महायुति ने, शुरू में विरोध करने की योजना बनाई थी, पाटिल के निर्देशों के बाद समर्थन किया, जिससे मोदी की आसान जीत हुई। जश्न मनाया गया।

Web Title : Kolhapur Politics: Sunil Modi's Path to Corporator Smoothed by Mahayuti Support.

Web Summary : Chandrakant Patil's intervention ensured Sunil Modi's unopposed selection as corporator in Kolhapur. Mahayuti, initially planning opposition, withdrew following Patil's instructions, facilitating Modi's easy win. Celebrations followed.