इचलकरंजीत केमिकल फॅक्टरीला भीषण आग, आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2022 13:06 IST2022-01-24T13:03:26+5:302022-01-24T13:06:54+5:30
सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

इचलकरंजीत केमिकल फॅक्टरीला भीषण आग, आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न
इचलकरंजी : शहरापासून जवळ असलेल्या तारदाळ येथील आवाडे टेक्स्टाईल पार्कमधील केमिकल फॅक्टरीला भीषण आग लागली. या आगीत फॅक्टरीचे मोठे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली. स्फोट झाल्याने आगीने रौद्ररुप धारण केले.
या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशामक दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांकडून शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.