कोल्हापूरचा महापौर कोण? उद्या महायुतीच्या नेत्यांची बैठक होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 12:30 IST2026-01-30T12:30:10+5:302026-01-30T12:30:30+5:30

सर्व पदांच्या वाटपावर चर्चा होणार

Mahayuti leaders to meet tomorrow in the backdrop of Kolhapur Municipal Corporation Mayor and Deputy Mayor elections | कोल्हापूरचा महापौर कोण? उद्या महायुतीच्या नेत्यांची बैठक होणार

कोल्हापूरचा महापौर कोण? उद्या महायुतीच्या नेत्यांची बैठक होणार

कोल्हापूर : महानगरपालिका महापौर, उपमहापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या नेत्यांची उद्या, शनिवारी बैठक होणार आहे. या बैठकीत महापालिकेतील सर्व पदांच्या वाटपावर चर्चा होणार आहे.

कोल्हापूर महानगरपालिकेवर महायुतीची सत्ता आली आहे. महायुतीत भाजप, शिंदेसेना, राष्ट्रवादी असे तीन पक्ष असल्यामुळे तिन्ही पक्षाच्या नगरसेवकांनी पदांसाठी, समित्यांसाठी आग्रह धरला आहे; परंतु नेतेमंडळींनी त्यावर अजूनही चर्चा केलेली नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूमुळे चर्चा थांबली आहे. आज, शुक्रवारीही चर्चा होणार नाही.

पालकमंत्री प्रकाश आबिटकर, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ शनिवारी कोल्हापुरात येणार आहेत. त्यामुळे शनिवार व रविवार असे दोन दिवस सर्व नेत्यांमध्ये सत्तावाटपाचे सूत्र ठरविले जाणार आहे. त्यामुळे महापालिकेतील सत्तावाटपाचे सूत्र शनिवार, रविवारी अधिक स्पष्ट होणार आहे.

नगरसेवकांना पहिल्या सभेची निघाली नोटीस

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर होत असलेल्या पहिल्याच विशेष सर्वसाधारण सभेची नोटीस गुरुवारी नवनिर्वाचित नगरसेवकांना नगरसचिव कार्यालयाकडून देण्यात आली. दि. ६ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता विभागीय आयुक्तांचे प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या सभेत महापौर व उपमहापौर यांची निवड केली जाणार आहे.

महापालिकेची निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता शहरवासीयांना नवीन पदाधिकारी निवडीचे वेध लागले आहेत. महापौर कोण होणार, उपमहापौर कोण होणार, कोणत्या राजकीय पक्षाला पहिली संधी मिळणार याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे. नवनिर्वाचित नगरसेवकांमध्येही पदाधिकारी होण्यासाठी मोठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.

विभागीय आयुक्तांच्या मंजुरीनंतर महापौर, उपमहापौर निवडीसाठी दि.६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता विशेष सर्वसाधारण सभा बोलविण्यात आली आहे. या सभेचा अजेंडा (विषय पत्रिका) कायद्यातील तरतुदीनुसार सात दिवस अगोदर नगरसेवकांना पाठवावा लागतो. म्हणून गुरुवारी तो सर्व नगरसेवकांना पाठविण्यात आला.

Web Title : कोल्हापुर महापौर चुनाव: महायुति की बैठक में सत्ता बंटवारे पर फैसला

Web Summary : कोल्हापुर में महापौर चुनाव की सरगर्मी तेज, महायुति नेताओं की सत्ता बंटवारे पर चर्चा। बीजेपी, शिंदे सेना और एनसीपी पदों के लिए प्रतिस्पर्धा कर रहे हैं, 6 फरवरी के चुनाव से पहले बातचीत तेज। बैठक का उद्देश्य कोल्हापुर नगर निगम में प्रमुख भूमिकाओं का वितरण तय करना है।

Web Title : Kolhapur Mayor Election: MahaYuti Meeting to Decide on Power Sharing

Web Summary : Kolhapur's mayoral election heats up as MahaYuti leaders meet to discuss power-sharing. With BJP, Shinde Sena, and NCP vying for positions, negotiations intensify before the February 6th election. The meeting aims to finalize the distribution of key roles within the Kolhapur Municipal Corporation.