Kolhapur: निवडणुकीनंतर कोल्हापुरातील तीन 'एम' घरी जातील, वडेट्टीवारांचा रोख कुणाकडे?
By पोपट केशव पवार | Updated: May 5, 2024 13:00 IST2024-05-05T12:59:34+5:302024-05-05T13:00:41+5:30
Maharashtra Lok sabha Election 2024: कोल्हापुरातील दाेन खासदार व एक मंत्री हे गद्दार आहेत. दलबदलू आहेत. त्यांना जनता सोडणार नाही. या लोकसभा निवडणुकीत तुमचे एक मत कोल्हापूर जिल्ह्यातील तीन 'एम' ला घरी घालवणार आहे, या शब्दांत विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पक्ष बदलणाऱ्यांना रविवारी इशारा दिला.

Kolhapur: निवडणुकीनंतर कोल्हापुरातील तीन 'एम' घरी जातील, वडेट्टीवारांचा रोख कुणाकडे?
- पोपट पवार
कोल्हापूर - कोल्हापुरातील दाेन खासदार व एक मंत्री हे गद्दार आहेत. दलबदलू आहेत. त्यांना जनता सोडणार नाही. या लोकसभा निवडणुकीत तुमचे एक मत कोल्हापूर जिल्ह्यातील तीन 'एम' ला घरी घालवणार आहे, या शब्दांत विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पक्ष बदलणाऱ्यांना रविवारी इशारा दिला.
वडेट्टीवार यांचा रोख थेटपणे मंडलिक, माने व मुश्रीफ यांच्यावर होता. शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक, र्धेर्यशील माने यांनी उद्वव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्याशी संगत केली आहे.तर वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ हे शरद पवार यांचे निष्ठावंत म्हणून राज्यभर ओळखले जात होते. मात्र, तेही अजित पवार यांच्याबरोबर भाजपच्या सत्तेत जाऊन बसले आहेत. त्यामुळे वडेट्टीवार यांनी उल्लेख केलेले जिल्ह्यातील तीन 'एम' हेच असल्याचे स्पष्ट होते.