Kolhapur: सोळांकुर येथे थेट पाईपलाईनचा व्हॉल्व लिकेज, लाखो लिटर पाणी वाया

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 15:26 IST2025-06-11T15:26:18+5:302025-06-11T15:26:46+5:30

परिणामी शहरात पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे

Lakhs of liters of water are being wasted due to leakage in the hall on the left canal at Solankur Taluka Radhanagari of the direct pipe line supplying water to Kolhapur city | Kolhapur: सोळांकुर येथे थेट पाईपलाईनचा व्हॉल्व लिकेज, लाखो लिटर पाणी वाया

Kolhapur: सोळांकुर येथे थेट पाईपलाईनचा व्हॉल्व लिकेज, लाखो लिटर पाणी वाया

सोळांकुर: कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या थेट पाईप लाईनचा सोळांकूर (ता. राधानगरी) येथील डाव्या कालव्यावरील व्हॉल्व लिकेजहून लाखो लिटर पाणी वाया गेले. योजनेच्या सुरुवातीपासून पाईपलाईनला गळती सुरु आहे.  त्यातून आतापर्यंत कोटी लिटर पाणी  वाया गेले आहे. पावसाळ्यापूर्वी सर्वच पाईप लाईन मार्गाची पाहणी करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून होत आहे.

थेट पाईपलाईनच्या गळतीचे गृहण काही केल्या कमी होत नाही. या योजनेमुळे स्थानिकांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. अधिकाऱ्यांच्या कारभाराबाबत संताप व्यक्त होत आहे. शहरवासियांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. तर दुसरीकडे धरणातील पाणी वाया जात आहे. 

पाण्याबरोबरच शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून जाण्याच्या अनेक घटना वारंवार घडलेल्या आहेत. याबाबत अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष होत आहे. परिणामी शहरात पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे.

Web Title: Lakhs of liters of water are being wasted due to leakage in the hall on the left canal at Solankur Taluka Radhanagari of the direct pipe line supplying water to Kolhapur city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.