कोल्हापूर दक्षिणमध्ये 'वार फिरलं', 'अमल'रुपी कमळ फुललं; महाडिक समर्थकांचा जल्लोष

By समीर देशपांडे | Updated: November 23, 2024 12:28 IST2024-11-23T12:25:43+5:302024-11-23T12:28:54+5:30

काँग्रेसला धक्का, आमदार ऋतुराज पाटील यांचा पराभव

Kolhapur South vidhan sabha assembly election result 2024 BJP candidate Amal Mahadik won from Kolhapur South | कोल्हापूर दक्षिणमध्ये 'वार फिरलं', 'अमल'रुपी कमळ फुललं; महाडिक समर्थकांचा जल्लोष

कोल्हापूर दक्षिणमध्ये 'वार फिरलं', 'अमल'रुपी कमळ फुललं; महाडिक समर्थकांचा जल्लोष

समीर देशपांडे

कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिणमधून भाजपचे अमल महाडिक यांनी निर्णायक आघाडी घेतली असून त्यांच्या शाहुपुरीतील संपर्क कार्यालयासमोर समर्थकांनी गुलाल उधळत जल्लोषाला सुरूवात केली आहे. काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांचे पुतणे विद्यमान आमदार ऋतुराज पाटील हे कॉंग्रेसकडून रिंगणात होते. महाडिक यांनी १६ व्या फेरीअखेर १९ हजार ७५ मतांची निर्णायक आघाडी घेतली आहे. अखेर महाडिक यांनी विजयी मैदान मारले.

२०१४ साली केवळ १४ दिवसात महाडिक निवडणूक रिंगणात उतरून त्यांनी तत्कालिन गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचा पराभव केला होता. त्यानंतर २०१९ च्या निवडणुकीत पाटील यांनी पुतणे ऋतुराज यांना दक्षिणमधून उतरवून महाडिक यांचा पराभव केला होता. आता पुन्हा २०२४ च्या निवडणुकीत महाडिक यांची विजयाकडे वाटचाल सुरू झाली आहे. 

भाजपला कोल्हापूर जिल्ह्यात केवळ दोनच जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे आणि एकूणच महाडिक परिवारासाठी अमल यांची जागा अत्यंत प्रतिष्ठेची बनली होती. अशा वेळी पहिल्या फेरीपासून आघाडी घेतलेले अमल महाडिक विजयाकडे वाटचाल करत असल्याचे चित्र साडे अकरा वाजता पहावयास मिळाले.

Web Title: Kolhapur South vidhan sabha assembly election result 2024 BJP candidate Amal Mahadik won from Kolhapur South