Kolhapur North By Election Result: जयश्री जाधवांची विजयाकडे वाटचाल, मताधिक्क्य मिळताच कुटुंबियांना अश्रू अनावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2022 12:39 IST2022-04-16T12:36:42+5:302022-04-16T12:39:27+5:30

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुक निकालात महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी १९ व्या फेरीअखेर १४१४० मतांची आघाडी ...

Kolhapur North By Election Result: Jayashree Jadhav marches towards victory, tears flow to his family | Kolhapur North By Election Result: जयश्री जाधवांची विजयाकडे वाटचाल, मताधिक्क्य मिळताच कुटुंबियांना अश्रू अनावर

Kolhapur North By Election Result: जयश्री जाधवांची विजयाकडे वाटचाल, मताधिक्क्य मिळताच कुटुंबियांना अश्रू अनावर

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुक निकालात महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी १९ व्या फेरीअखेर १४१४० मतांची आघाडी घेतली. या मतमोजणीची प्रक्रिया जाधव यांच्या प्रतिभानगर येथील निवासस्थानी त्यांच्या कुटुंबियांकडून क्षणाक्षणाला जाणून घेतली जात होती. जाधव यांची विजयाकडे वाटचाल सुरू झाल्यानंतर त्यांच्या सासू प्रेमला, कन्या चेतना, सून दस्मिता, आदींना आनंदाश्रू अनावर झाले.

चंद्रकांत जाधव (अण्णा) यांच्या आठवणींनी त्यांचा कंठ दाटला. या निवासस्थानी अण्णांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले होते. त्यांना अभिवादन करून जयश्री जाधव यांनी मतमोजणीच्या प्रक्रियेची माहिती जाणून घेण्यास सुरूवात केली. या प्रक्रियेतील १९ व्याफेरीअखेर त्यांना १४१४० मतांची आघाडी मिळाल्यानंतर विजयाकडे त्यांची वाटचाल सुरू झाली. त्यावर त्यांच्या कुटुंबियांना आनंदाश्रू अनावर झाले.

अण्णांच्या माघारी कोल्हापूरकरांनी सांभाळली जबाबदारी

अण्णांच्या माघारी कोल्हापूरकरांनी जबाबदारी सांभाळून आम्हा जाधव कुटुंबियांना पाठबळ दिल्याचे सांगत कन्या चेतना यांचा कंठ दाटून आला. क्षणाक्षणाला आम्हा सर्वांना अण्णांची (बाबा) आठवण येत असल्याचे सांगत त्यांना हुंदका अनावर झाला. अण्णांच्या आई प्रेमला यांच्याही अश्रूंचा बांध फुटला. ते सर्व पाहून उपस्थित कार्यकर्त्यांना देखील गहिवरून आले. त्यांनी अण्णा, जयश्री जाधव आणि कॉंग्रेस, महाविकास आघाडीच्या विजयाच्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला.

Web Title: Kolhapur North By Election Result: Jayashree Jadhav marches towards victory, tears flow to his family