आमदार जयश्री जाधव यांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 19:14 IST2022-04-20T19:07:23+5:302022-04-20T19:14:50+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीतील विजयानंतर आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांनी बुधवारी मुंबईत वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ...

आमदार जयश्री जाधव यांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट
कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीतील विजयानंतर आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांनी बुधवारी मुंबईत वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी आमदार जाधव यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस मुख्यमंत्री ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांनी ताकदीने काम केले. यामध्ये शिवसेनेचे महत्त्वपूर्ण योगदान राहिल्याबद्दल पालकमंत्री सतेज पाटील यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांचे आभार मानले.
यावेळी, रश्मी ठाकरे, खासदार संजय मंडलिक, मालोजीराजे, शिवसेना संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, जिल्हा प्रमुख संजय पवार, विजय देवणे आदी उपस्थित होते.
शरद पवार, उपमुख्यमंत्र्यांकडून जयश्री जाधव यांचे अभिनंदन
काल, मंगळवारी आमदार जयश्री जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबईत भेट घेतली. त्यांनी या विजयाबद्दल जाधव यांचे अभिनंदन केले. चांगले काम करा, महाविकास आघाडीचे सरकार तुमच्यासोबत असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी दिली.