Kolhapur: कोटींचा निधी, १८ गावांना पाणी कधी?; हातकणंगले तालुक्यातील जलजीवन योजना अपूर्णच
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 18:58 IST2025-04-19T18:58:23+5:302025-04-19T18:58:53+5:30
दत्ता बिडकर हातकणंगले : जिल्हा प्रशासनाचा झोळ, तालुक्यातील १८ गावाच्या जलजिवन योजना मध्ये घोळ. निविदा रक्कम पेक्षा जादा १५ ...

Kolhapur: कोटींचा निधी, १८ गावांना पाणी कधी?; हातकणंगले तालुक्यातील जलजीवन योजना अपूर्णच
दत्ता बिडकर
हातकणंगले : जिल्हा प्रशासनाचा झोळ, तालुक्यातील १८ गावाच्या जलजिवन योजना मध्ये घोळ. निविदा रक्कम पेक्षा जादा १५ टक्के दराच्या निविदा मंजूर झाल्याने ठेकेदारानी कोटीची उड्डाणे मारली आहेत. कोटयवधी च्या निधी वर डल्ला मारून ही गेली तीन वर्ष योजना अपूर्ण आहेत.
तालुक्यातील १८ गावच्या जलजीवन योजना जिल्हा प्रशासन, ठेकेदार आणि स्थानिक कारभारी यांच्या मिलीभगत मूळे तीन वर्ष रखडल्या आहेत. १८ गावच्या योजनाचे अंदाजपत्रक आणि निविदा एक कोटी पासून चार कोटी पर्यन्त आहेत. या योजना ठेकेदाराना काम करायला परवडत नाहीत या कारणास्तव जिल्हा प्रशासनाने २०२२ मध्ये मूळ निविदा रक्कम मध्ये १० ते १५ टक्के वाढवून जादा दराने निविदा मंजूर केल्या आहेत.
तीन वर्षापूर्वी काम सुरू करण्याचे आदेश मिळाल्याने ठेकेदार मालामाल झाले आहेत. ठेकेदारानी कोटीत उड्डाणे मारुन ही गावच्या पाणी योजना तीन तीन वर्ष रखडल्याने ठेकेदाराचे हीत जोपासणारे प्रशासन कारवाईला मात्र हात आखडता घेते असल्याने जलजीवनचे पाणी मिळणार कधी याकडे ग्रामस्थाचे डोळे लागले आहेत.
१० ते १५ टक्के जादा दराच्या निविदा मंजूर
नरंदे, चावरे, खोची, कोरोची, कुंभोज, चोकाक, हिंगणगांव, बिरदेववाडी, दुर्गेवाडी, माले, मुडशिंगी, लक्ष्मीवाडी, पट्टणकोडोली, रुकडी, तळसंदे, निलेवाडी. तारदाळ, यळगुड .
१८ गावच्या जलजिवन योजनाची अंदाजपत्रके २०१९- २०२० च्या शासन दर सूची प्रमाणे झाली होती. योजनाच्या निविदा २०२१- २२ मागविणेत आल्या. मागील दर सूची प्रमाणे ठेकेदारानी काम होणार नसल्याचे स्पष्ट केल्याने जिल्हा परिषद मुख्याधिकारी आणि कार्यकारी आभयंता याच्या संयुक्त समितीने जादा दराच्या निविदा मंजूर केल्या असाव्यात. मंजुरीचा विषय जिल्हास्तरावरील आहे. - एस.बी. कुलकर्णी, उप अभियंता. ग्रामिण पाणी पुरवठा, हातकणंगले.