जप्त देशी-विदेशी मद्याच्या बाटल्या चोरट्यांनी केल्या लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 18:37 IST2020-01-11T18:35:55+5:302020-01-11T18:37:21+5:30

इचलकरंजी येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाचे कुलूप तोडून चोरट्यांनी देशी-विदेशी मद्याच्या 1 लाख 3 हजार 661 रुपयांच्या बाटल्या लंपास केल्या. याबाबतची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली आहे.

  Indigenous foreigners seize bottles of alcoholic liquor | जप्त देशी-विदेशी मद्याच्या बाटल्या चोरट्यांनी केल्या लंपास

जप्त देशी-विदेशी मद्याच्या बाटल्या चोरट्यांनी केल्या लंपास

ठळक मुद्दे जप्त देशी-विदेशी मद्याच्या बाटल्या चोरट्यांनी केल्या लंपास 1 लाख 3 हजार 661 रुपयांच्या किंमतीच्या 509 बाटल्या लंपास

इचलकरंजी : येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाचे कुलूप तोडून चोरट्यांनी देशी-विदेशी मद्याच्या 1 लाख 3 हजार 661 रुपयांच्या बाटल्या लंपास केल्या. याबाबतची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली आहे.

येथील भगतसिंग बागेच्या पिछाडीस राज्य उत्पादन शुल्क विभागाचं कार्यालय आहे. विविध ठिकाणी कारवाई करून जप्त केलेल्या देशी-विदेशी मद्याच्या बाटल्या या कार्यालयात ठेवल्या होत्या.

9 जानेवारी रोजी रात्री या कार्यालयाचे कुलूप तोडून चोरट्यांनी देशी-विदेशी मद्याच्या जप्त केलेल्या 1 लाख 3 हजार 661 रुपयांच्या किंमतीच्या 509 बाटल्या लंपास केल्या.

ही बाब 10 जानेवारी रोजी कार्यालयातील गणपती हजारे यांच्या निदर्शनास आली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title:   Indigenous foreigners seize bottles of alcoholic liquor