'थांबलास तर कोयता आणि पळालास तर गोळी, व्हाट्सअॅप स्टेटस पाहून पोलिसांकडून अटक सत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 18:37 IST2021-06-06T18:34:03+5:302021-06-06T18:37:12+5:30
Crimenews Police Kolhapur : तरुणांमध्ये सध्या व्हाटसअँप स्टेटसचं क्रेझ प्रचंड वाढलंय. मात्र त्यातून धक्कादायक प्रकार देखील सुरु झाले आहेत. शहरात स्वत:ची दहशत निर्माण करण्यासाठी व्हाट्सअॅप स्टेटसला तलवारी आणि बंदूकीचे व्हिडीओ ठेवून सर्वसामान्यांना घाबरवण्याचा प्रयत्न केला जातोय. इचलकरंजी शहरात अशा प्रकारे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणांविरोधात पोलिसांनी मोहिमच सुरु केली आहे. जो तरुण अशाप्रकारे स्वत:ची क्रेझ निर्माण करण्याचा प्रयत्न करेल त्याच्याविरोधात थेट गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारात पोलिसांनी दिला आहे.

'थांबलास तर कोयता आणि पळालास तर गोळी, व्हाट्सअॅप स्टेटस पाहून पोलिसांकडून अटक सत्र
इचलकरंजी : तरुणांमध्ये सध्या व्हाटसअँप स्टेटसचं क्रेझ प्रचंड वाढलंय. मात्र त्यातून धक्कादायक प्रकार देखील सुरु झाले आहेत. शहरात स्वत:ची दहशत निर्माण करण्यासाठी व्हाट्सअॅप स्टेटसला तलवारी आणि बंदूकीचे व्हिडीओ ठेवून सर्वसामान्यांना घाबरवण्याचा प्रयत्न केला जातोय. इचलकरंजी शहरात अशा प्रकारे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणांविरोधात पोलिसांनी मोहिमच सुरु केली आहे. जो तरुण अशाप्रकारे स्वत:ची क्रेझ निर्माण करण्याचा प्रयत्न करेल त्याच्याविरोधात थेट गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारात पोलिसांनी दिला आहे.
विशेष म्हणजे अशा प्रकारे दहशत निर्माण करणाऱ्या दोघांना पोलिसांनी जेरबंद केलं आहे.संबंधित कारवाई शिवाजीनगर आणि शहापूर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी केली आहे.कोल्हापूर नाका परिसरात राहणारा शरद इलाज तसेच आंबेडकर नगरमधील शाहरुख कामडुगी यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
शाहरुख कामडुगी या तरुणाने व्हाट्सअॅप स्टेटसला भयानक व्हिडीओ शेअर केला होता. थांबलास तर कोयता आणि पळालास तर गोळी, नाक्यावर फक्त आबांची टोळी, असे शब्द या व्हिडीओत होते. तसेच व्हिडीओत तलवार, पिस्तूल हे देखील होते. याशिवाय बदला घेण्याबाबतही व्हिडीओत भाष्य करण्यात आलं होतं. विशेष म्हणजे संबंधित व्हिडीओ एकाकडून दुसऱ्याला असे अनेकांकडे फॉरवर्ड करण्यात आला. तसेत अनेकांनी असे व्हिडीओ व्हाट्सअॅप स्टेटसला ठेवले. पोलिसांनी याबाबत माहिती मिळाली.