Ichalkaranji Crime: प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्यानेच केला बापाचा खून, पत्नी व मुलीस पोलीस कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2022 19:15 IST2022-02-23T18:49:58+5:302022-02-23T19:15:55+5:30
इचलकरंजी : डोक्यात गज घालून मुलीने बापाचा खून केल्याची घटना काल, मंगळवारी (दि.२२) इचलकरंजी घडली होती. याप्रकरणी पोलीस तपासात ...

Ichalkaranji Crime: प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्यानेच केला बापाचा खून, पत्नी व मुलीस पोलीस कोठडी
इचलकरंजी : डोक्यात गज घालून मुलीने बापाचा खून केल्याची घटना काल, मंगळवारी (दि.२२) इचलकरंजी घडली होती. याप्रकरणी पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली. पत्नी व मुलीचे बाहेर प्रेमसंबंध असल्याने कुटुंबात झालेल्या वादातून शांतीनाथ केटकाळे यांचा खून झाल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले.
याप्रकरणी पत्नी सुजाता व मुलगी साक्षी या दोघींना पोलिसांनी अटक केल्याची माहिती शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी प्रसारमाध्यमांना दिली. पत्नी सुजाता व मुलगी साक्षी यांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना २८ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
मृत शांतीनाथ केटकाळे आपल्या कुटुंबासह गांधी विकासनगर परिसरात रहात होते. पत्नी सुजाता व मुलगी साक्षी या दोघींचे बाहेर कोणाशी तरी प्रेम सबंध सुरू असल्याची माहिती त्यांना समजली. या कारणावरून गेल्या दोन वर्षांपासून त्यांच्यात वारंवार वाद निर्माण होत होते.
काल, मंगळवारी रात्री आठच्या सुमारास पुन्हा शांतिनाथ केटकाळे यांचा पत्नी सुजाता व मुलगी साक्षीसोबत वाद झाला. या वादाच्या रागातूनच संतापलेल्या सुजाता व साक्षी यांनी शांतीनाथ केटकाळे यांचा कायमचा काटा काढण्यासाठी त्यांच्या डोक्यात कटावणी व बॅटने वर्मी घाव घातला.
या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. हल्ल्यानंतर पत्नी व मुलगी पोलिसात हजर झाल्या. यावेळी दोघींच्या कपड्यांवर रक्ताचे डाग होते. आम्हीच शांतीनाथ केटकाळे यांचा खून केल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. तपासानंतर या दोघींना अटक करण्यात आली. याबाबतचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक भालचंद्र देशमुख हे करत आहेत.