Kolhapur: शाहूवाडीतील वृद्धाचा कोरोनाने मृत्यू, बळींची संख्या चार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 17:49 IST2025-06-13T17:49:35+5:302025-06-13T17:49:53+5:30

८ रूग्ण सक्रीय

Fourth death due to Corona in Kolhapur district | Kolhapur: शाहूवाडीतील वृद्धाचा कोरोनाने मृत्यू, बळींची संख्या चार

Kolhapur: शाहूवाडीतील वृद्धाचा कोरोनाने मृत्यू, बळींची संख्या चार

कोल्हापूर: कोरोनाने जिल्ह्यात दाखल रूग्णांपैकी चौथा बळी घेतला असून शाहूवाडी तालुक्यातील धनगरवाडा, बांबवडे येथील ८५ वर्षाच्या वृध्दाचा गुरूवारी सकाळी साडे सहा वाजता सीपीआरमध्ये मृत्यू झाला आहे. याआधीचे तीनही बळी हे अन्य जिल्ह्यातील होते.

जिल्ह्यात १४ मे पासून ३० जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यापैकी १६ रूग्ण कोल्हापूर महापालिका कार्यक्षेत्रातील असून ९ ग्रामीण भागातील आहेत. सक्रीय आठ रूग्ण असून शाहूवाडी तालुक्यातील या वृध्दाची तब्येत विविध आजारांमुळे फारच बिघडली होती. त्यांना ७ जून रोजी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले होते. 

त्यांचे ह्दय कमकुवत झाले होते. त्यांच्यावर याआधी अॅन्जोप्लास्टीही करण्यात आली होती. त्यांना किडनीचाही आजार होता. वय जास्त, अनेक आजार आणि त्यात कोरोनाची लागण. त्यामुळे त्यातच त्याचा मृत्यू झाला. गेल्या दोन दिवसात कोरोनाचे आणखी दोन रूग्ण वाढले आहेत. परंतू सौम्य लक्षणे असल्याने घाबरण्याचे कारण नसल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

Web Title: Fourth death due to Corona in Kolhapur district