Municipal Election: इचलकरंजी मनपासाठी फेरआरक्षण काढले, सहा प्रभागांत बदल झाले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 17:26 IST2025-11-18T17:24:40+5:302025-11-18T17:26:58+5:30
सोडतीला नागरिकांची अल्प उपस्थिती

Municipal Election: इचलकरंजी मनपासाठी फेरआरक्षण काढले, सहा प्रभागांत बदल झाले
इचलकरंजी : महापालिका निवडणुकीसाठी सोमवारी फेरआरक्षण काढण्यात आले. त्यामध्ये सहा प्रभागांतील बारा आरक्षणांमध्ये बदल झाला, तर दहा प्रभागांतील आरक्षणे ही पूर्वीप्रमाणेच कायम राहिली आहेत.
महापालिका निवडणुकीसाठी ११ नोव्हेंबरला प्रभाग आरक्षण सोडत काढली होती. मात्र, तांत्रिक कारणाने पुन्हा एकदा घोरपडे नाट्यगृहामध्ये सोडत काढण्यात आली. ११ नोव्हेंबरला अनुसूचित जातीसाठी टाकलेली आरक्षणे पूर्वीप्रमाणे कायम ठेवली. सोमवारी नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या १३ चिठ्ठ्यांमधून आर्वी खोंद्रे, वरद पाटील, रागिनी नेमिष्टे आदी मुलांच्या हस्ते १४ अ, ८ अ, २ अ, १३ अ आणि ७ ब या प्रभागांतील नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांच्या ५ चिठ्ठ्या काढण्यात आल्या. त्यामुळे ६ प्रभागांतील १२ जागांमध्ये बदल झाला, तर १० प्रभागांतील ४० जागा या पूर्वीप्रमाणे कायम राहिल्या आहेत.
आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील, उपायुक्त नंदू परळकर यांच्या उपस्थितीत आरक्षणाची सोडत काढण्यात आली. मात्र, या आरक्षण सोडतीसाठी नागरिकांनी अत्यल्प उपस्थिती लावली.
फेरआरक्षणामध्ये बदलले प्रभाग
पूर्वीचे आरक्षण - झालेला बदल
प्रभाग २
अ - ना.मा.प्रवर्ग - ना.मा.प्रवर्ग महिला
क- सर्वसाधारण महिला - सर्वसाधारण
प्रभाग ५
अ - ना.मा. प्रवर्ग महिला - ना.मा. प्रवर्ग
क - सर्वसाधारण - सर्वसाधारण महिला
प्रभाग ७
ब - ना.मा. प्रवर्ग - ना.मा. प्रवर्ग महिला
क - सर्वसाधारण महिला - सर्वसाधारण
प्रभाग ११
अ - ना.मा. प्रवर्ग महिला - ना.मा. प्रवर्ग
क - सर्वसाधारण - सर्वसाधारण महिला
प्रभाग १२
अ - ना.मा. प्रवर्ग महिला - ना.मा. प्रवर्ग
क - सर्वसाधारण - सर्वसाधारण महिला
प्रभाग १४
अ - ना.मा. प्रवर्ग - ना.मा. प्रवर्ग महिला
क - सर्वसाधारण महिला - सर्वसाधारण
६५ प्रभागांचा लेखाजोखा
महापालिका निवडणुकीसाठी ६५ प्रभाग आहेत. त्यातील सर्वसाधारण महिलांसाठी २१, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी ९ व अनुसूचित जाती महिलांसाठी ३ अशा ३३ जागा महिलांसाठी राखीव आहेत, तर उर्वरितपैकी ३ जागा अनुसूचित जाती, ८ जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग व २१ जागा सर्वसाधारणसाठी आहेत.