कोल्हापूर जिल्ह्यात मतदान करण्यात चंदगड, शाहूवाडी मागे; मतदान वाढविण्याचे आव्हान

By समीर देशपांडे | Published: April 30, 2024 12:39 PM2024-04-30T12:39:49+5:302024-04-30T12:40:23+5:30

जिल्ह्यातील ३८७ मतदान केंद्रांवर ६० टक्केपेक्षा कमी मतदान

Chandgad, Shahuwadi lag behind in polling in Kolhapur district | कोल्हापूर जिल्ह्यात मतदान करण्यात चंदगड, शाहूवाडी मागे; मतदान वाढविण्याचे आव्हान

कोल्हापूर जिल्ह्यात मतदान करण्यात चंदगड, शाहूवाडी मागे; मतदान वाढविण्याचे आव्हान

समीर देशपांडे

कोल्हापूर : लोकसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत चंदगड आणि शाहूवाडी तालुका मतदान करण्यात मागे पडला आहे. या दोन्ही तालुक्यात प्रत्येकी ८५ मतदान केंद्रांवर राज्याच्या सरासरीपेक्षा कमी म्हणजे ६० टक्केपेक्षा कमी मतदान झाले आहे. जिल्ह्यात १० विधानसभा मतदारसंघात एकूण ३८७ मतदान केंद्रांवर याच पद्धतीने कमी मतदान झाले असून ते वाढवण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे.

गेल्यावेळीही मतदान वाढावे यासाठी प्रशासनाने प्रयत्न केले होते. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात त्यावेळी धनंजय महाडिक यांचा पराभव करून संजय मंडलिक विजयी झाले होते. तर हातकणंगले मतदारसंघातून धैर्यशील माने यांनी राजू शेट्टी यांचा पराभव केला होता. कोल्हापूरमध्ये १५ तर हातकणंगले मतदारसंघात १७ उमेदवार रिंगणात होते. महाराष्ट्रात झालेल्या पहिल्या दोन टप्प्यातील मतदानाची टक्केवारी गतवर्षीपेक्षा घटलेली आहे. त्यामुळे उर्वरित टप्प्यातील निवडणुकांमध्ये मतदानाची टक्केवारी सुधारावी यासाठी प्रशासनही प्रयत्न करत आहे.

याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील ६० टक्केपेक्षा ज्या मतदान केंद्रावर मतदान कमी झाले आहे अशा केंद्रांची स्वतंत्र यादी तयार करण्यात आली आहे. या ठिकाणी ‘आम्ही कमी मतदान केले आहे’ असे फलक लावण्यात येत असून यंदा तरी मोठ्या संख्येने मतदान करावे असे नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे.

येथे झाले ६० टक्केपेक्षा कमी मतदान 

अ.नविधानसभा तालुका नागरी केंद्रे ग्रामीण केंद्रे एकूण
१ चंदगड आजरा०० २० २० 
  गडहिंग्लज००४०४०
  चंदगड०१२४२५
राधानगरीराधानगरी००१९१९
  भुदरगड०२१११३
  आजरा०९०९१८
कागलकागल००००००
  आजरा००१३१३
  गडहिंग्लज१६०२१८
४ कोल्हापूर दक्षिणकोल्हापूर शहर२९००२९
  करवीर०००५०५
करवीरपन्हाळा०००८०८
  गगनबावडा०१०९१०
  करवीर०००१०१
कोल्हापूरउत्तर५६००५६
शाहूवाडीशाहूवाडी००८०८०
  पन्हाळा०००५०५
हातकणंगलेहातकणंगले००००००
९ इचलकरंजीहातकणंगले०९०२११
१० शिरोळशिरोळ१४०२१६

कागल, हातकणंगलेची बाजी

कागल विधानसभा मतदारसंघात कागल, गडहिंग्लज आणि आजरा तालुक्यातील मतदान केंद्रांचा समावेश आहे. संजय मंडलिक हे कागल तालुक्यातीलच असल्याने या तालुक्यातील सर्वच मतदान केंद्रांवर ६० टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले आहे. हीच परिस्थिती हातकणंगले तालुक्यातील आहे. हातकणंगले तालुक्यातील उमेदवार असलेले धैर्यशील माने रिंगणात होते. त्यामुळे या तालुक्यातील सर्वच मतदान केंद्रांवर ६० टक्केपेक्षा अधिक मतदान झाले आहे.

कमी मतदानाची कारणे

  • पक्षबदलूपणाला मतदान कंटाळले
  • प्रचंड उष्मा
  • उमेदवारांबद्दलची नाराजी
  • एकूण व्यवस्थेबद्दलची अनास्था


गतवेळच्या मतदानाची स्थिती

                                  कोल्हापूर       हातकणंगले
एकूण मतदार              १८, ८०.४९६      १७,७६,५५५
पोस्टल मतदान           ५,४४४                ५,९५५
एकूण झालेले मतदान  १३,३०,८५२        १२,५२,२११

Web Title: Chandgad, Shahuwadi lag behind in polling in Kolhapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.