Ichalkaranji Election 2026: चर्चेसाठी बोलावलं अन्..; भाजपच्या बंडखोर उमेदवाराबाबत नेमकं काय घडलं.. वाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 16:30 IST2026-01-02T16:30:11+5:302026-01-02T16:30:47+5:30
निवडणूक लढवण्यावर मी ठाम : अश्विनी कुबडगे

Ichalkaranji Election 2026: चर्चेसाठी बोलावलं अन्..; भाजपच्या बंडखोर उमेदवाराबाबत नेमकं काय घडलं.. वाचा
इचलकरंजी : माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी चर्चेसाठी बोलावून घेतलं. पक्ष कार्यालयात घेऊन जात आपल्या गळ्यात स्कार्फ घातला आणि भाजपला पाठिंबा दिल्याचे व उमेदवारी मागे घेतल्याचे जाहीर केले. मात्र, मी माघारी घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मी निवडणूक लढवण्यावर ठाम आहे, अशी माहिती भाजपच्या बंडखोर उमेदवार अश्विनी कुबडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
वाचा : इचलकरंजी महापालिका निवडणुकीत सर्वच प्रभागांत चुरस, 'या'ठिकाणी महायुतीतच कुस्ती
कुबडगे म्हणाल्या, मी विद्यार्थी परिषदेपासून पक्षामध्ये काम करते. ही कार्यकर्त्यांची निवडणूक असल्याचे वरिष्ठांनी सांगितले होते. त्यानुसार मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहे, यात गैर काहीच नाही. आवाडे यांनी मला त्यांच्या कार्यालयात चर्चा करण्यासाठी बोलावून घेतले. भाजप कार्यालयात जाऊन चर्चा करूया, असे सांगितले आणि तिथे आल्यानंतर चर्चा न करता पाठिंबा दिल्याचे सांगितले.
वाचा: निष्ठावानांचा अपक्ष अर्ज; 'आयारामां'ना मात्र एबी फॉर्म; भाजप, शिंदेसेना, राष्ट्रवादी अन् काँग्रेसमध्ये आयात उमेदवार किती..जाणून घ्या
पक्षाने मला कोणताही शब्द दिलेला नाही. माझी उमेदवारी जनतेने हातात घेतली आहे. त्यामुळे माघार घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सुरेश हाळवणकर यांना चर्चेसंदर्भात काही माहिती नाही. गैरसमजुतीमधून त्यांनी मी माघार घेतल्याची घोषणा केली आहे.