Kolhapur: शिरोळमध्ये वीटभट्टी मुजराचा शस्त्राने वार करुन खून, मृत मिरज तालुक्यातील 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 13:17 IST2025-05-20T13:12:06+5:302025-05-20T13:17:00+5:30

शिरोळ : शिरोळ -कनवाड या रस्त्यावरील शेतात सुरू असलेल्या बांधकामावर वीटभट्टी मुजराचा धारदार शस्त्राने खून झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी ...

Bricklayer stabbed to death with a weapon in Shirol Kolhapur, deceased from Miraj taluka | Kolhapur: शिरोळमध्ये वीटभट्टी मुजराचा शस्त्राने वार करुन खून, मृत मिरज तालुक्यातील 

Kolhapur: शिरोळमध्ये वीटभट्टी मुजराचा शस्त्राने वार करुन खून, मृत मिरज तालुक्यातील 

शिरोळ : शिरोळ-कनवाड या रस्त्यावरील शेतात सुरू असलेल्या बांधकामावर वीटभट्टी मुजराचा धारदार शस्त्राने खून झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी उघडकीस आली. राजू दिलीप कोलप ( वय ४० रा. निलजी बामणी, ता.मिरज, जि. सांगली) असे मृताचे नाव असून, या घटनेची नोंद रात्री उशिरापर्यंत झाली नव्हती.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, शिरोळ-कनवाड रस्त्यावरील आण्णासो महात्मे यांच्या शेतात घराचे बांधकाम सुरू आहे. बांधकामासमोर त्यांचा जनावरांचा गोठा आहे. सोमवारी सायंकाळी महात्मे कुटुंबातील व्यक्ती जनावरांचे चारापाणी करण्यासाठी गेले होते. यादरम्यान त्यांना बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी एक व्यक्ती झोपल्याचे दिसून आले. त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता. त्याच्या अंगावर धारदार शस्त्राने वार केले होते. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला होता. मृत व्यक्ती ही येथील माने यांच्या वीटभट्टीवर काम करणारा मजूर असल्याचे स्पष्ट झाले.

रविवारी मध्यरात्री अज्ञातांनी राजू घोलप याचा धारदार शस्त्राने खून केला केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. राजू यांच्या डोक्यावर, छातीवर, डाव्या हातावर धारदार शस्त्राने वर्मी घाव घातल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.

दरम्यान, सोमवारी रात्री उशिरापर्यंत घटनास्थळाचा पोलिसांकडून पंचनामा सुरू होता. घटनास्थळी फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले होते. उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. रोहिणी सोळंके पोलिस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासा संदर्भात आवश्यक त्या सूचना दिल्या. खुनाची बातमी समजतात घटनास्थळी बघ्याची मोठी गर्दी झाली होती.

Web Title: Bricklayer stabbed to death with a weapon in Shirol Kolhapur, deceased from Miraj taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.