Kolhapur: राधानगरी-दाजीपूर मार्ग ४५ दिवस बंद राहणार, कुठून वळवण्यात आली वाहतूक..जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 13:53 IST2025-03-05T13:52:46+5:302025-03-05T13:53:19+5:30
गौरव सांगावकर राधानगरी : निप्पाणी देवगड राज्य मार्गावरी रस्त्याचे दुरुस्तीचे व नूतनिकरणाचे काम करण्यात येणार असून दाजीपूर ते राधानगरी ...

संग्रहित छाया
गौरव सांगावकर
राधानगरी : निप्पाणी देवगड राज्य मार्गावरी रस्त्याचे दुरुस्तीचे व नूतनिकरणाचे काम करण्यात येणार असून दाजीपूर ते राधानगरी या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक ४५ दिवस बंद करण्यात येणार आहे. १० मार्च ते ३० एप्रिलपर्यंत या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार असल्याची सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या आहेत.
या मार्गांवरील लहान वाहने बलिंगा कोते धामोड - तारळे करिवडे दाजीपूर मार्गे तर कोकणातूनकोल्हापूर कडे येणारी वाहने नांदगाव फाटा वैभववाडी गगनबावडा मार्गे कोल्हापूर कडे वळविण्यात येणार आहेत. तसेच कर्नाटकातून कोकणात जाणारी वाहने आंबोली आजरा गडहिंग्लज व संकेश्वर गडहिंग्लज आजरा आंबोली अशी वाहने वळविण्यात येणार आहेत.