Ichalkaranji Municipal Election 2026: भाजपच्या एका कार्यकर्त्याची उमेदवारी नाकारली, महिला रस्त्यावर उतरुन लागल्या रडू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 13:08 IST2025-12-27T13:06:50+5:302025-12-27T13:08:48+5:30
निष्ठावंत कार्यकर्त्याला डावलून धनदांडग्यांना उमेदवारी दिल्याचा आरोप संतप्त महिलांनी केला

Ichalkaranji Municipal Election 2026: भाजपच्या एका कार्यकर्त्याची उमेदवारी नाकारली, महिला रस्त्यावर उतरुन लागल्या रडू
इचलकरंजी : प्रभाग क्रमांक ६ मधील भाजपच्या एका कार्यकर्त्याची उमेदवारी नाकारल्याचे समजल्यानंतर विक्रमनगर भागातील काही महिला रस्त्यावर उतरून रडत दु:ख व्यक्त करू लागल्या. त्यामुळे उमेदवारही रडू लागले आणि वातावरण भावनिक बनले.
भाजपचे दीपक पाटील हे प्रभाग क्रमांक ६ मध्ये सक्रिय होते. त्यांना उमेदवारी डावलल्याचे समजल्यानंतर विक्रमनगर भागातील संतप्त महिला रस्त्यावर उतरल्या. महिला व उमेदवारही रडू लागल्याने तेथील वातावरण धीर गंभीर बनले.
निष्ठावंत कार्यकर्त्याला डावलून धनदांडग्यांना उमेदवारी दिल्याचा आरोप संतप्त महिलांनी केला. अखेर पोलिस आल्यानंतर महिला निघून गेल्या. अपक्ष निवडणूक लढविण्यासंदर्भात बुथमधील कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन निर्णय घोषित करण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.