पर्यटनासाठी आलेल्या कोल्हापूरच्या तरुणाचा राधानगरीत ह्रदयविकाराने मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2023 22:56 IST2023-12-22T22:56:06+5:302023-12-22T22:56:46+5:30

शितल उदयराव कामत असे ३७ वर्षीय तरुणाचे नाव

A young man from Kolhapur, who came for tourism, died of a heart attack in Radhanagar | पर्यटनासाठी आलेल्या कोल्हापूरच्या तरुणाचा राधानगरीत ह्रदयविकाराने मृत्यू

पर्यटनासाठी आलेल्या कोल्हापूरच्या तरुणाचा राधानगरीत ह्रदयविकाराने मृत्यू

गौरव सांगावकर, लोकमत न्यूज नेटवर्क, राधानगरी: राधानगरी येथे पर्यटनासाठी आलेल्या शुक्रवार पेठ कोल्हापूर येथील शितल उदयराव कामत (वय३७) या तरुणाचा ह्रदयविकाराने मृत्यू झाला. या घटनेची नोंद राधानगरी पोलीस ठाण्यामध्ये झाली आहे. याबाबत राधानगरी पोलीसाकडून मिळालेली माहीती अशी की, शुक्रवार दि.२२ रोजी राधानगरी येथील हाँटेल शिवार समोरील मुख्य रस्त्याच्या डाव्या बाजूला एकांत रिसाँर्टकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्याजवळील मोकळ्या जागेमध्ये सकाळच्या दरम्यान शितल कामत हे मृतावस्थेत आढळून आले. याची माहीती पो.पाटील अनिल संकपाळ यांनी राधानगरी पोलीस ठाण्यामध्ये दिली. त्यानंतर वैद्यकीय तपासणीच्या प्राथमिक अंदाजानुसार कामत यांचा मृत्यू ह्रदयविकाराने झाल्याचे स्पष्ट झाले. याबाबतचा तपास पोलीस सहाय्यक निरीक्षक महेश घेरडीकर करत आहेत.

Web Title: A young man from Kolhapur, who came for tourism, died of a heart attack in Radhanagar