Kolhapur Municipal Election 2026: उमेदवार दक्ष...१८ प्रभागांमध्ये गणित बिघडवणार अपक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 17:54 IST2026-01-06T17:51:57+5:302026-01-06T17:54:37+5:30
तिरंगी, चौरंगी लढतीचे चित्र

Kolhapur Municipal Election 2026: उमेदवार दक्ष...१८ प्रभागांमध्ये गणित बिघडवणार अपक्ष
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुती विरोधात महाविकास आघाडीतील काँग्रेस-उद्धवसेना असा सरळ सामना होत असला तरी जनसुराज्य, वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटानेही सवता सुभा मांडत दोन्ही आघाड्यांची डोकेदुखी वाढवली आहे. विशेष म्हणजे यात तब्बल १८ प्रभागांमध्ये ७३ अपक्षांनीही रिंगणात उतरवून युती-आघाडीच्या उमेदवारांचा थेट मार्ग वाकड्या वाटेने नेला आहे.
वाचा: कोल्हापुरात शिंदेसेनेकडून रस्त्याच्या कामात दहा कोटींचा ढपला, रविकिरण इंगवले यांचा आरोप
कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत २० प्रभागांमध्ये ८१ जागांसाठी ३२७ उमेदवार मैदानात आहेत. काँग्रेस-उद्धवसेनेने महाविकास आघाडीची मोट बांधतानाच भाजप, शिंदेसेना व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने महायुती म्हणून त्यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे. युती-आघाडीच्या उमेदवारांमध्ये काही ठिकाणी थेट दुरंगी सामना होत असला तरी १८ प्रभागांमधील काही जागांवर अपक्षांनीही उडी घेतल्याने तिरंगी, चौरंगी लढतीचे चित्र तयार झाले आहे.
वाचा : दहा तास मतदान प्रक्रिया सुरू राहणार; चार सदस्य निवडण्याची प्रथमच संधी
कोणत्या प्रभागात अपक्ष
प्रभाग - अपक्ष
१ - २
३ - २
४ - ४
५ -१
६ -३
७ -२
८ -४
१० - १
११ - १०
१२ - ५
१३ - ८
१४ -४
१५ - २
१६ -१
१७ - ५
१८ - ७
१९ - ७
२० - ३