Ichalkaranji Municipal Election Voting 2026: इचलकरंजीत दोन तासात ७.८८ टक्के मतदान; डीकेटीई शाळेच्या केंद्रासमोर मोठी गर्दी, पोलिसांनी जमावाला पांगवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 11:49 IST2026-01-15T11:49:08+5:302026-01-15T11:49:49+5:30
नाट्यगृह जवळील डीकेटीई शाळेच्या केंद्रासमोर मोठी गर्दी जमल्याने पोलिसांच्या राखीव तुकडीने तेथे धाव घेत जमावाला पांगवले

Ichalkaranji Municipal Election Voting 2026: इचलकरंजीत दोन तासात ७.८८ टक्के मतदान; डीकेटीई शाळेच्या केंद्रासमोर मोठी गर्दी, पोलिसांनी जमावाला पांगवले
इचलकरंजी: महानगरपालिकेच्या पहिल्या निवडणुकीसाठी आज, गुरुवारी शहरातील ३०२ मतदान केंद्रांवर सकाळी ७.३० वाजता उत्साहात मतदानास सुरुवात झाली. १६ प्रभागांतील ६५ जागांसाठी मतदान होत आहे. काही ठिकाणी सकाळपासून मतदारांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसत आहे. पहिल्या दोन तासांमध्ये ७.८८ टक्के मतदान झाले.
इचलकरंजीतील गर्ल्स हायस्कूल मधील एका केंद्रावर एका विशिष्ट पक्षाला मतदान करण्यास सांगत असल्याचा आरोप झाल्यानंतर मतदान केंद्रातील एका अधिकाऱ्याला पोलिसासमवेत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे नेण्यात आले. याघटनेनंतर मतदान केंद्रावर गोंधळ झाला.
मतदार यादीतील गोंधळ, बूथ क्रमांकांची चूक आणि माहितीअभावी अनेक मतदारांचा गोंधळ उडत आहे. काही ठिकाणी मतदारांना यादीत नाव शोधण्यासाठी बूथवर धावपळ करावी लागत आहे. चार मते द्यायची असल्याने मतदानास वेळ लागत असून, विशेषतः महिला व ज्येष्ठ नागरिक गोंधळलेले दिसत आहेत.
Kolhapur Municipal Election Voting 2026: कोल्हापुरात पहिल्या दोन तासांमध्ये ९.६४ टक्के मतदान
नाट्यगृह जवळील डीकेटीई शाळेच्या केंद्रासमोर मोठी गर्दी जमल्याने पोलिसांच्या राखीव तुकडीने तेथे धाव घेत जमावाला पांगवले. मतदान केंद्रावर कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आले आहेत.